यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये होळी, धुलीवंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा..
यावल दि.१३ (सुरेश पाटील) – गुरुवार दि.१३ रोजी यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल यावल मध्ये होळी धुलीवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन मॅडम यांनी होळीची पूजा केली यावेळी शाळेच्या इंग्लिश मीडियम प्राचार्य दिपाली धांडे मॅडम यांनी उपस्थिती होत्या.शाळेच्या ईशा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना होळी या सणाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.आपल्यातील वाईट दुर्गुण विचारांचे दहन करून सर्व विषयी जिव्हाळा प्रेम बाळगणारा असा हा सण सर्वांनी आनंदात उत्साहात साजरा केला.ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी कवडीवाले मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे मॅडम व गौरी भिरुड मॅडम यांनी उपस्थिती दिली,याप्रसंगी कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.अशा पद्धतीने शाळेत होळी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.