शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळ रिव्हर्स ट्रकच्या धडकेत तीन रिक्षा व पाच दुचाकींचा चुराडा..
जळगाव – सिमेंटने भरलेला लोडेड ट्रक शिवाजीनगर पुलावरून रिव्हर्स येऊन रिक्षा स्टॉपवर थांबलेल्या तीन रिक्षा आणि पाच मोटारसायकली दाबल्या गेले. या घटनेत चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. हि घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर माहिती अशी की ट्रक क्रमांक MH 19 CY 7745 हा सिमेंट घेऊन शिवाजीनगर पुलावरून टावरचौकाकडे जात असताना चढतीवर ट्रक जात असताना ट्रक पुढे न जाता तो मागे रिव्हर्स येऊ लागला. पुलाजवळ दत्तमंदिर आहे त्या मंदिरा जवळ रिक्षा स्टॉप आहे. बाजुला मोठे झाड आहे त्या झाडाखाली एक नाश्त्याची गाडी आणि मोटारसायकलीसह काही नागरीक उभे होते. ट्रक रिव्हर्स येऊन डायरेक्ट रिक्शा आणि मोटारसायकल वर धडकली त्यात तीन रिक्षांचा अक्षरशः चुराडा झाला आणि पाच मोटारसायकली दाबल्या गेल्या.
या अपघातामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी आणि दुचाकीस्वारांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन छेडले. घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.