पाचोरा
पाचोरा जळगाव दरम्यान रेल्वेची मोठी दुर्घटना: कर्नाटक एक्स्प्रेसच्या धडकेत १२ जणांचा मृत्यू ..

जळगाव – पाचोरा ते जळगाव रेल्वेमार्गावर बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्स्प्रेस मधील अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. याचदरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना धडक दिली. या दुर्घटनेत किमान १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहे.
पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या भीतीमुळे प्रवाशी खाली उतरले.याच दरम्यान या ठिकाणी दुसऱ्या रेल्वे ट्रॅकवर येणाऱ्या बंगळूर एक्स्प्रेसखाली येऊन १२ प्रवासी ठार झाले व अनेक जण जखमी झाले.
या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
तसेच या अपघातामध्ये मयत झालेल्यांचे मृतदेह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले आहे.