जळगाव

शिवाजीनगरात कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या..

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २६ ऑक्टोबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात सनी विनोद डोळे (वय २१, रा. शिवाजीनगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याची आजी सुमनबाई तायडे जखमी झाल्या आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी सुरज नारायण वानखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे

मिळालेल्या माहितीनुसार, सनी डोळे आणि त्याच्या बहिणीचा पती सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. संशयित सुरज वानखेडे याने सनीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे समजते. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला. घटनेनंतर सनीला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, सनीच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई आणि आजी यांनी रुग्णालयात केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. अवघ्या २१व्या वर्षी सनीचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी सुरज नारायण वानखेडे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

कौटुंबिक वादातून झालेल्या या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्याची पार्श्वभूमी याबाबत पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे