यावल

राजोरे जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले स्वावलंबनाचे धडे कार्यशाळा शिक्षिका वैशाली पाटील यांच्या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून मूल्यवर्धन..

 

यावल (प्रतिनिधी ) तालुक्यातील राजोरे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचे बळ मिळावे,या उद्देशातून स्वनिर्मित वस्तू तयार करणे, मूल्यवर्धन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

राजोरे तालुका यावल येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांच्यात स्वावलंबनाची आवड निर्माण करणे, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मूल्यवर्धनाधारित स्वनिर्मिती वस्तू तयार करणे कार्यशाळेचे आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आले. या कार्यशाळेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गावातील महिलावर्ग आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्यांचा मिळालेला उत्स्फूर्त सहभाग हा विद्यार्थ्यांंचा आत्मविश्वास व उत्साहा वाढवणारा ठरला.

या कार्यक्रमास सुनंदा पाटील, नलिनी पाटील, भारती महाजन, मीनाक्षी महाजन, पूजा बिऱ्हाडे या महिलांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना टाकाऊतून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. स्वतः केलेल्या वस्तू निर्मितीतून मिळणारा आनंद याचे सुंदर महत्त्व यातून विद्यार्थ्यांना कळले. प्रत्यक्ष कृतीतून मूल्यवर्धन व कौशल्य विकास या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ कृती करायला मिळाली नाही, तर व्यक्तिमत्त्व विकासालाही मोठा हातभार लागला.

*विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकला स्वनिर्मितीचा आनंद:* स्वतः तयार केलेल्या वस्तूंमुळे मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि अभिमान दिसून येत होता. स्वावलंबनाची शिकवण या साध्या उपक्रमातून रुजली आणि स्वतः तयार करण्याचा आत्मविश्वास मुलांमध्ये निर्माण झाला. महिला आणि शिक्षिकांच्या हाताची घडी व कौशल्य पाहून मुलांची निरीक्षण क्षमता आणि सूक्ष्म एकाग्रता वाढली.

*शिक्षिकेचा सक्रिय सहभाग, उत्तम संचलन:* शाळेतील उपशिक्षिका वैशाली पाटील यांनी या संपूर्ण कार्यशाळेचे केवळ मार्गदर्शन केलेच नाही,तर स्वतः मुलांसोबत बसून वाती बनवून प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाचे तत्त्वज्ञाना चे उत्तम उदाहरण सादर केले. शिक्षिकेला स्वतःसोबत काम करताना पाहून विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह संचारला होता. गावातील माता-भगिनींचा सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हा आनंददायी शनिवार खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे