यावल

यावल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ‘व्यसनमुक्ती पोस्टर स्पर्धा’ संपन्न; हर्षाली बारी आणि संघशीला भालेराव ठरल्या मानकरी..

यावल (प्रतिनिधी )- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजा चे,कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत नुकतीच व्यसनमुक्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेचा मुख्य उद्देश युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे आणि समाजात त्याविषयी जनजागृती निर्माण करणे हा होता.

*स्पर्धेचे स्वरूप व सहभाग*

युवकांमध्ये व्यसनमुक्तीचे महत्त्व रुजवण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण ३९ स्वयंसेवकांनी अतिशय उत्साहात सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांच्या व विचारांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.

*स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली:*

प्रथम क्रमांक: कु. हर्षाली संतोष बारी (द्वितीय वर्ष विज्ञान – SYBSc)

द्वितीय क्रमांक: कु. संघशीला संदीप भालेराव (द्वितीय वर्ष कला – SYBA)

*मान्यवरांचे मार्गदर्शन व कौतुक*

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड, उपप्राचार्य तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी सर्व सहभागी व विजयी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. युवकांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेऊन निरोगी आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे