आरोग्य व शिक्षणचाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शिक्षण भरारीला शिष्यवृत्तीचे बळ..!

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्तीचे वितरण…

शिष्यवृत्ती योजना ही स्व.जिभाऊंच्या कार्याला कृतीतून आदरांजली – आमदार मंगेश रमेश चव्हाण

चाळीसगाव : माणसाने कोणाच्या घरात जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नसते. परंतू आपल्या कर्तुत्वाच्या बळावर उंच शिखर गाठत आकाश भरारी घेण हे नक्की त्याच्या हातात असते. अनेकदा उंच भरारीसाठी कोणाची तरी भक्कम साथ हवी असते. आणि हिच साथ या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून एक भाऊ म्हणून तुम्हा सर्वांना देत आहे. मिळालेल्या या प्रोत्साहनातून भरारी घेत परिस्थितीवर मात करा. चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांना म्हटले जाते त्यांच्या कार्याला कृतीतून आदरांजली देण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव तालूक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती व शिक्षण व सहकार महर्षी स्व. रामराव जिभाऊ पाटील यांच्या पूण्यतिथी निमित्ताने आयोजित चाळीसगाव तालूक्यातील आर्थिकदुष्टया दुर्बल कूटूंबातील प्रतिभावान विदयार्थ्यांसाठी स्व. रामराव जिभाऊ पाटील विदयार्थी सन्मान शिष्यवृत्ती वितरण समारंभाप्रसंगी बोलत होते.

चाळीसगाव शहरातील वैभव मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला व्यासपिठावर तालूक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पोलीस अधिक्षक एम. राजकूमार, मुख्यकार्यकारी अधिकारी. जि.प, जळगाव डॉ. पंकज आशीया, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी अभयसिंह देशमुख, तहसीलदार अमोल मोरे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव उपस्थित होते तर चाळीसगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षण संस्था संचालक, आजी माजी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व त्यांचे पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार चव्हाण पूढे म्हणाने की, ४२५ विदयार्थ्याना हि शिष्यवृत्ती देण्यात आली. यातील ४५ विदयार्थी हे पालकत्व नसलेले आहेत. सरासरी ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे तसेच शैक्षणिक कर्ज, वस्तीगृह मिळवून देण्यासाठी देखील मदत केली जाणार आहे. निवड समितीने पारदर्शकपणे आर्थिकदुष्टया दुर्बळ व प्रतिभावंत विदर्यार्थ्यांची निवड केली आहे. हि शिष्यवृत्ती अल्पशी असली तरी शिक्षणासाठी गरज भासल्यास निवड समिती नक्कीच अधिक मदतीची शिफारस करेल असे आवाहन देखील त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

जळगाव जिल्हाचे पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, कूठल्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी शिक्षण हाच एकमेव उपाय आहे. आम्ही सर्व अधिकारी हे तुमच्या सारख्याच सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहोत. आपण ग्रामीण भागातील आहोत असा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास ठेवून मेहनत करा. प्रत्येकाने परिस्थितीचा बाऊ न करता चांगल्या दर्जाच शिक्षण घ्यायला हवे. शासनाच्या योजना कमी अधिक प्रमाणात कामात येतातच मात्र आमदार मंगेश चव्हाण यांच्या सारखा लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी असल्याने तुम्ही फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करा. यशस्वी होण्यासाठी शिक्षण आणि मेहनतीला पर्याय नाही असे ते म्हणाले तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशीया यांनी क्षेत्र कूठलेही असो, आपल्यातील वेगळेपण त्याठिकाणी दाखवावे, शिक्षणाबरोबरच विविध गुण अंगिकारले पाहिजे. येणाऱ्या काळात बहूआयामी लोकांची देशाला गरज आहे असे त्यांनी विदर्यार्थ्यांना संबोधित केले.

आपल्या मुलाला शिष्यवृत्ती मिळाली व त्यातुन त्याला प्रोत्साहन मिळत तोही मोठा अधिकारी होईल असे म्हणत मंगेश दादा चव्हाण हे भावाप्रमाणे त्याच्या पाठिमागे उभे राहिले असे म्हणत एका आईने आपल्या भावना व्यक्त करतांना त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरुपात ज्या १० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती देण्यात आली त्या विद्यार्थ्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ध्वनिचित्रफिती बनविण्यात आल्या होत्या. तसेच रामराव जिभाऊ पाटील यांच्या जीव कार्याची ओळख करून देणारी डॉक्युमेंटरी देखील यावेळी दाखविण्यात आली. लेखक कवी जिजाबराव वाघ यांनी शब्दबद्ध केलेल्या या ध्वनिचित्रफिती पाहून उपस्थित देखील भारावले.

शिष्यवृत्ती योजनेला स्व.जिभाऊ यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केल्याबद्दल रामराव जिभाऊ पाटील यांच्या परिवारातर्फे आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सदर कार्यक्रमात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे कुमारी धनश्री कावडे हिला लॅपटॉप भेट देण्यात आला, तीला उच्च शिक्षणासाठी कर्ज मंजूर करून देणारे कॅनरा बँकेचे व्यवस्थापक श्री.प्रदीप डोंगरे यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रा.तुषार चव्हाण सर यांनी शिष्यवृत्ती साठी समिती नेमण्यापासून ते विद्यार्थी निवड यापर्यंतची सर्व प्रक्रिया समजावून सांगत योजने मागचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगीता गवळी, एकनाथ गोफणे सर यांनी केले तर आभार प्रा.रविंद्र पाटील यांनी मानले

फेटे घालून विद्यार्थ्यांचा सन्मान तर आमदारांसोबत सेल्फीसाठी झुंबड…शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना भगवा फेटा घालून त्यांचा सन्मान करण्यात आला, तसेच त्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले. आमदार चव्हाण यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन सर्वांशी संवाद साधला, यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांची देखील आमदार मंगेश चव्हाण यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे