चाळीसगाव

नार पार बाबत सचीवांसोबत बैठकीचे पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन स्थगित उन्मेश पाटील यांची माहिती.

गिरणा नदीच्या प्रवाहात सलग 28 तासांच्या जलसमाधी आंदोलनाची राज्यभर चर्चा.

चाळीसगाव – नार पार योजना ही आमची हक्काची असून आमचे पाणी गुजरातला वळवण्याकरता नार पार गिरणा खोरे योजना केंद्र सरकारने रद्द केल्याचे पाप केले आहे. गुजराथ धार्जिणे राज्य सरकार तोंडावर बोट हाताची घडी घालून बोटचेपी भूमिका घेत आहेत ही भूमिका गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या विरोधात असून शेतकऱ्यांमध्ये असंतोषचा तीव्र उद्रेक झाला आहे. काल पासून सलग 28 तास गिरणा नदी पात्रात जलसमाधी आंदोलनात बसलो. मुसळधार पावसात कृती समिती शेतकऱ्यांसह आंदोलन सुरू ठेवत नार पार योजना मंजूर झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर मात्र जलसमाधी आंदोलन थांबवणार नाही. असा पवित्रा घेतला असताना संबधित विभागाकडून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हलगर्जीपणा करण्यात येत असल्याचे तीव्र भावना शेतकऱ्यांची झाल्याने आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला.तेव्हा माञ शासनाला जाग आली.अखेर पालकमंत्री यांच्या मध्यस्थीने जिल्हाधिकारी यांनी येत्या पंधरवाड्यात सचीवांसोबत बैठकीचे आपल्या उपस्थितीत आश्र्वासन दिल्याने जलसमाधी आंदोलन थांबवित असल्याची माहिती माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिली आहे.

आज मेहुणबारे ता. चाळीसगांव येथील गिरणा नदीच्या पुलाजवळील पंपिंग स्टेशन जवळ त्यांनी गिरणेच्या प्रवाहात उतरून प्रचंड घोषणाबाजी करीत माजी खासदार उन्मेश दादा पाटील जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. आज आंदोलन स्थगित केल्यानंतर झालेल्या आभार सभेत ते बोलत होते. आजच्या आंदोलनामध्ये नार पार गिरणा खोरे बचाव कृती समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रचंड घोषणाबाजी करीत दूपारी बारा वाजता रास्ता रोको करण्यात आला. सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन सुरू होते.यावेळी हायवेवरून जाणारे वाहन चालक, मोटरसायकल चालक, ग्रामस्थ यांचे आंदोलनाने लक्ष वेधले माजी खासदार उन्मेश दादा नेतृत्वात मुसळधार पावसात तिरंगा हातात घेऊन शेतकरी बांधवांच्या रास्ता रोको केल्यानं आंदोलनाने उग्र रूप धारण केले होते.आंदोलनाची राज्यभर चर्चा सुरू आहे.

या आंदोलनाला माजी खासदार उन्मेशदादा पाटील, सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख डॉ.हर्षल माने, दीपक राजपूत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील जि प गटनेते शशिकांत भाऊ साळुंखे तालुकाप्रमुख दिनेश पाटील जेष्ठ नेते कैलास सूर्यवंशी,सहसंपर्कप्रमुख सुनील पाटील, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी,एड.अभय पाटील, शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, जि प सदस्य उद्धव मराठे, करण दादा पवार,बंजारा समाजाचे नेते मोरसिंगभाऊ राठोड, महेंद्रसिंग पाटील, रमेश चव्हाण, दिलीप घोरपडे, अनिलबापू निकम, ऍड राजेंद्र सोनवणे, विवेक सोनवणे, कैची बापू पाटील,भीमरावनाना खलाणे, एड.राहुल जाधव, एड. राहुल पाटील, एड.साबीर सैय्यद,एड.राहुल सिंग पाटील ऍड. निळकंठ पाटील, एड. प्रशांत बोदार्डे,बाळासाहेब पाटील,चांगदेव राठोड,नरेंद्र जैन, प्रताप पाटील, किशोर पाटील, कैची बापू पाटील,रवींद्र मोरे,सारंग जाधव, संजय पाटील, नरेश साळुंखे,चेतन वाघ, भैय्यासाहेब वाघ, दीपक खंडाळे, पद्माकर पाटील, प्रवीण पाटील, भाऊसाहेब पाटील, मुकेश गोसावी, सागर रणदिवे, राज महाजन, भास्कर पाटील, कल्पेश मालपुरे, वाल्मीक महाले, सोनू अहिरे, रवीभाऊ चौधरी,हर्षल माळी,रॉकी धामणे, किरण घोरपडे, राहुल पाटील, राहुल रणदिवे, माधव रणदिवे, रोहित भारती, अमित सुराणा, शुभम पाटील, निलेश देसले, लक्ष्मण उन्हाळे, सौरव पाटील, प्रमोद निकम, हेमराज वाघ, प्रताप पाटील, हिरामण वाघ, सचिन पाटील, शेषराव चव्हाण, खान्देश हित संग्रामचे सुरेश पाटील, भैयासाहेब पाटील, कैलास पाटील, शशिकांत भदाणे, नगरसेवक भगवान राजपूत, शेखर देशमुख, रोशन जाधव, बंटी ठाकूर, रामचंद्र जाधव, काँग्रेसचे रवी पोळ, लतिफ खान,वसीम चेअरमन,अलीम शेख, नवाज शेख ,अल्ताफ खान गौतम सोनवणे, ललित बिडे,मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष हर्षल पाटील तालुका अध्यक्ष कुणाल पाटील तालुका सचिव तमाल देशमुख शहर उपाध्यक्ष किशोर पाटील,कार्याध्यक्ष निलेश पाटील, यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी आंदोलनकर्ते करते सहभागी झाले आहेत.

28 तास माजी खासदार गिरणा नदी पात्रात रात्रभर आंदोलन राहणार सुरु

खासदार उन्मेश दादा पाटील हे नार पार गिरणा खोरे बचाव कृती समितीच्या सदस्यांसह गिरणा नदीत जलसमाधी साठी ठाण मांडून बसले होते .त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जोपर्यंत ठोस आश्वासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही नदीच्या पात्रातून बाहेर येणार नाही. 28 तास होवून देखील शासनाच्या हलगर्जीपणा केल्याचे चित्र उभे राहीले.आंदोलकर्त्यांनी रास्ता रोको केल्यानं आंदोलनात मोठी गर्दी उसळली होती.

आभार सभेत उन्मेश दादा यांचे मान्यवरांनी केले कौतुक

गिरणा खोरे समृद्ध करण्यासाठी नारपार योजना महत्त्वाची असताना वेळोवेळी आम्ही शासनाला निवेदन देऊन पाठपुरावा करून केंद्र सरकारमध्ये लोकसभेत प्रश्न उचलून धरला,आमदार असताना विधानसभेत प्रश्न उचलून धरला तरी देखील शासनाने याविषयी गंभीर न राहता गुजराथ राज्याला फायदा होईल म्हणून नारपार योजना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी रद्द केली याचे आम्हाला दुःख आहे. आमच्या हक्काचे पाणी गिरणा धरणात सोडल्यास चाळीसगाव पाचोरा भडगाव एरंडोल पर्यंतचा सिंचनाचा अनुशेष भरून निघत गिरणा खोरे समृद्ध होणार असून आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. माञ पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

प्रशासनाचा हलगर्जीपणा

नार पार गिरणा खोरे बचाव कृती समितीच्या वतीने वेळोवेळी निवेदन, पाठपुरावा, आंदोलन करुन देखील आजच्या जलसमाधी आंदोलनाबाबत प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंदोलकांमध्ये संताप उसळला असून जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाण्यात राहणार असून हे आंदोलन रात्री देखील सुरु होते. यामुळे गिरणा खोऱ्यात प्रचंड असंतोष पसरला होता.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे