चाळीसगाव मध्ये 10 लाखाचा गांजा जप्त : चाळीसगाव पोलिसांची कारवाई..
चाळीसगाव – १० लाख रुपये किंमतीचा सुमारे ५० किलो गांजा जप्त , अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या अशोक भरतसिंग पाटील याच्या शहर पोलिसांनी छापा टाकून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून १० लाख रुपये किंमतीचा सुमारे ५० किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याचयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिक्षक कॉलनीत राहणारा अशोक भरतसिंग पाटील हा अवैधरित्या गांज विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहा पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप पाटील, निवासी नायब तससिलदार जितेंद्र धनराळे, पोउनि सुहास आव्हाड, पोहेकॉ सुभाष घोडेस्वार, राहुल सोनवणे, विनोद भोई, पोना महेंद्र पाटील, पोकॉआशुतोष सोनवणे, ज्ञानेश्वर पाटोळे, पवन पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर गिते, मनोज चव्हाण, राकेश महाजन, रविंद्र बच्छे, स्नेहल मांडोळे, अनिकेत जाधव, प्रविण वाणी यांचे पथक तयार केले.
या पथकाने छापा टाकून संशयित अशोक पाटील यांच्याकडून १० लाख ६३०० रुपयांचा ५० किलो ३१५ ग्रॅम गांजा मिळून आला. तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण २२ लाख ६ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित अशोक पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
कृषी केंद्रावर भेट देऊन रोहिणी खडसे यांनी साधला शेतकरी बांधवांशी संवाद..