भुजल सर्वेक्षण विभागात दुषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी दारूच्या बाटल्यांचा सर्रास वापर…
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील भुजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत दारूच्या बाटलीत दुषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार जळगाव शहरातील नागरिक सुरज नारखेडे यांनी उघडकीस आणला आहे. पाण्याचे नमुने दारूच्या बाटलीमध्ये तपासले जात असतील तर पाण्याच्या नमुने तपासणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून हा जीवघेणा प्रकार आहे.
जिल्ह्याभरात दूषीत पाण्याचे नमुने दरवर्षी तपासले जातात. जिल्हा परीषद, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांच्याकडून भुजल सर्वेक्षण यांच्याकडून पाण्याचे नमुने प्रयोग शाळेत तपासले जातात. त्याचप्रमाणे जिल्हा परीषदेकडूनही भूजल सर्वेक्षण विभागाकडून तीन महिन्यानंतर गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेऊन ते तपासले जातात. पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल तपासणीनंतर दिला जातो.
त्यामुळे मद्याच्या बाटलीतील पाण्याच्या नमुन्याच्या रिपोर्टबाबत निश्चितच साशंकता निमार्ण झाली आहे. या भुजल सर्वेक्षण विभागांतर्गत पाणी तपासणी प्रयोग शाळा कार्यरत आहे. मात्र पाणी हे जीन समजले जाते आणि याच पाण्याचे नमुने प्रयोग शाळेत मद्याच्या बाटलीत तपासले जात असतील तर पाण्याच्या शुध्दतेचे काय? असा प्रश्न निर्माण झाला असून हा प्रकार उघडकीस आणणाऱ्या सुरज नारखेडे यांनीआक्षेप घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…