जळगाव जिल्हामहाराष्ट्र

माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघा तर्फे आझाद मैदान मुंबई येथे धरणे व उपोषण आंदोलन.

माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या प्रमुख मागण्या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघा तर्फे आझाद मैदान मुंबई येथे धरणे व उपोषण आंदोलन.

जळगांव (प्रतिनिधी)माहितीचा अधिकार कायदा 2005 हा सर्वसामान्य जनतेला सहज माहिती उपलब्ध व्हावी व न्याय मिळावा प्रशासनात पारदर्शक पणे कामे व्हावीत तसेच देशातील व राज्यातील भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे माहिती अधिकार कायद्याची संपूर्ण राज्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच काही प्रमुख मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन व उपोषण आंदोलन दि.१ मार्च 2023 रोजी सकाळी १० वाजेपासून आझाद मैदान मुंबई येथे होणार आहे

धरणे आंदोलन व उपोषणातील प्रमुख मागण्या

१) माहिती आयुक्तांच्या रिक्त जागा त्वरित भरा २) आयुक्तांची निवड पत्रकार शास्त्रज्ञ निवृत्त न्यायाधीश समाजसेवक यांच्यातून करण्यात यावी ३) माहिती अधिकाराचा सामान्य जनतेमध्ये प्रसार व प्रचार व्हावा यासाठी वार्षिक 100 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करा ४) जन माहिती अधिकारी व अपील अधिकारी यांना प्रशिक्षण सक्तीचे करा ५) प्रत्येक सरकारी कार्यालयात कलम 4 ची काटेकोर अंमलबजावणी करा ६) माहिती अधिकार कायद्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा

याप्रमुख मागण्यांसह माहिती अधिकार कायद्याची संपूर्ण राज्यात कठोर अमलबजावणी व्हावी यासाठी १ मार्च 2023 रोजी मुंबई येथे आझाद मैदान सकाळी १० वाजेपासून धरणे व उपोषण आंदोलन होणार आहे तरी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे इतर समविचारी संस्था संघटनेचे कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी ही या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष चंद्रभान कोलते उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश पाटील व जळगाव जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे  यांनी केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे