अमळनेरआरोग्य व शिक्षण

आश्रमशाळा पिंपळे बु.येथील उपक्रमशील शिक्षक श्री.स्वप्निल पाटील यांना राज्यस्तरीय जाणता राजा शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले..

अमळनेर (प्रतिनिधी) – दि.26 रोजी अमळनेर येथील जी.एस.हायस्कूलच्या आय.एम.ए. लायन्स हॉलमध्ये कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती, धुळे जिल्हा व अमळनेर तालुका क्रीडा समिती, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात यशवंत माध्य.व उच्च माध्य.आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु.येथील उपक्रमशील शिक्षक श्री.स्वप्निल हिम्मतराव पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 2023 चा राज्यस्तरीय जाणता राजा शिक्षकरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सदर राज्य पुरस्कार वितरणासाठी जि.प.सदस्य सौ.जयश्रीताई पाटील, खा.शि.मंडळाचे कार्यअध्यक्ष, श्री.गोविंदजी मुंदडा, श्री.प्रदीपजी अग्रवाल, श्री.नीरज अग्रवाल, श्री.हरी वाणी इ.मान्यवर उपस्थित होते.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी पिंपळे बु.येथील अध्यक्षा श्रीमती विद्याताई पाटील, सचिव श्री.युवराज पाटील, मा.मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच तालुका क्रीडा समिती, अध्यक्ष श्री.सुनील वाघ व कार्याध्यक्ष श्री.संजय पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे