यावल

यावल येथे शांतता समितीची बैठक संपन्न

यावल (प्रतिनिधी)- तिथीनुसार येत्या 10 मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सह आगामी काळातील सण उत्सव, उत्साहात व शांततेत पार पडावे तसेच कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची सर्व धर्मीयांनी आप- आपल्या उत्सवात काळजी घ्यावी आणि , सोशल नेटवर्कद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले. येथील पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले.

यावल येथील पोलीस ठाण्यात आगामी 10 मार्च रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती तसेच आगामी काळातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्व धर्मीय बांधवांची उपस्थिती होती यात सर्वांनीच आपल्या हातून इतर धर्माच्या धार्मिक भावना दुखावणार नाही यासाठी काळजी घ्यावी तसेच सोशल नेटवर्कद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज यासंदर्भात पोलिसांना माहिती द्यावी व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी केले. या बैठकीमध्ये माजी नगराध्यक्ष चंद्रकांत देशमुख, हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, भाजपा शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, शिवसेनेचे शरद कोळी, हाजी ताहेर शेख चांद, अनिल जंजाळे, पवन पाटील,मोहसीन खान, अजहर खाटीक, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, सय्यद युनूस, हाजी इकबाल खान,हबीब हाजी गफ्फार शाह सह मोठ्या संख्येत शांतता समिती सदस्य व नागरिकांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे