गुन्हेगारीब्रेकिंगयावल

वृद्धाच्या खून प्रकरणी सुनेसह एक ताब्यात

सुनेकडे वारंवार शरीर सुखाची मागणी करीत असल्याच्या कारणावरून सासऱ्याचा खून

यावल ( प्रतिनिधी )- तालुक्यातील किनगाव येथील ५८ वर्षीय वृद्धाच्या खून प्रकरणी पोलिसांनी वृद्धाच्या सुनेसह एका व्यक्तीस अटक केले आहे. सुनेकडे वारंवार शरीर सुखाची मागणी करीत असल्याच्या कारणावरून सुनेने बहिणीच्या मानलेल्या मुलाचे मदतीने वृध्दाचा खून केल्याचा प्राथमिक चौकशीत दिसून आल्याने एलसीबीच्या पथकाने  दोघांना यावल पोलिसांच्या ताब्यात दिले.

या संदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील किनगाव बु. येथील भीमराव शंकर सोनवणे वय ५८ वर्ष या वृद्धाचा  मृतदेह किनगाव – चुंचाळे रस्त्यावरील नाल्यावरील पुलाखाली शुक्रवारी आढळून आला होता . घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाचे वरीष्ठ पो. नि. किसन नजन पाटील यांना तपासाबाबत तसेच अज्ञात आरोपीस अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी तातडीने चक्र फिरवली पो.हे.का.विजयसिंह पाटील, कमलाकर बागुल, सुधाकर अंभोरे ,संदीप सावळे, किरण धनगर ,प्रमोद लाडवंजारी ,अविनाश देवरे, रणजीत जाधव ,ईश्वर पाटील ,दर्शन ढाकणे ,प्रमोद ठाकूर ,या पोलीस कर्मचाऱ्यांचे दोन पथके तयार करत ,पथकाने लगेच कारवाईस सुरवात करत किनगाव गावातून गोपनीय माहिती मिळवली त्यानुसार पथकाने ,वरणगाव येथील रहिवासी तथा सध्या उदळी ता. रावेर येथे राहत असलेल्या , जावेद शाह उर्फ जय आलिशा वय 32 वर्ष यास उधळी येथून शुक्रवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले त्याचे कडे गुन्हाबाबत चौकशी केली असता भीमराव सोनवणे यांची सुन मिनाबाई विनोद सोनवणे यांचे सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . मयताच्या मानेवर वार करून खून केल्याचे सांगितले, तर दुसऱ्या पथकाने किनगाव येथील राहते घरून मयताची सून मीनाबाई विनोद सोनवणे हिला सुद्धा ताब्यात घेतले आहे तिला विचारले असता तिने सासरा वारंवार शरीर सुखाची मागणी करीत असल्याचे कारणावरून सासऱ्याचा काटा काढला असल्याचे सांगितले. एलसीबी पथकाने संशयित आरोपींना येथील पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर येथील पोलिसांनी आरोपीस अटक केले असून पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार सुनील मोरे पुढील तपास करीत आहेत

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे