गुन्हेगारीब्रेकिंगयावल

अट्रावल येथे दोन गटात दंगल महिला फौजदारासह बरेच जण जखमी गावात तणावपूर्ण शांतता

यावल(प्रतिनिधी)-तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन गटात दंगल झाली असून परस्परांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत येथील महीला फौजदारासह दोन्ही गटा कडील आठ जण जखमी झाले आहेत.शुक्रवारी सायंकाळी १२ गाड्या वरून झालेला वाद शनिवारी उफाळून येत थोर महापुरूषाच्या पुतळ्याचे विटंबन झाल्याने परस्परामधे हानामारी झाली. घटनेचे वृत्त कळताच येथील पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले .पोलीस अधीक्षक एम. राजकुमार ,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपविभाग उपविभागीय पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे , गुन्हा अन्वेषण चे पो. नि. किसन नजन पाटील घटनास्थळी तळ ठोकून आहेत दरम्यान प्रशासनाच्या वतीने थोर महापुरुषाच्या पुतळ्याचे पुनर स्थापन करण्यात आली आहे गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे

तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी सकाळी दोन गटात तुफान हाणामारी दगडफेक होत दंगल झाली. , शुक्रवारी सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होता बारा गाड्या वर बसण्यावरून एका तरुणाशी वाद झाला होता. हा वाद शनिवारी ( १ एप्रील रोजी) पुन्हा उफाळुन आला. काही माथेफिरूनी थोर महापुरूषाच्या पुतळयाची विटंबना केली. दोन्ही गटाकडून परस्परांवर दगडफेक करण्यात आली यात , दोन्ही घटाकडील आठ ते दहा जण जखमी झाले असुन , त्यांच्या वर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेचे वृत्त कळतात येथील पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले यात एका पोलिसासह सुनिता कोळपकर ह्या महिला फौजदार जखमी झाले आहेत

गावाला पोलीस छावणीचे स्वरूप

दंगलीचे स्वरूप पाहता यावल पोलिसांसह फैजपूर, भुसावळ,  सावदा, जळगाव पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी पोहोचले आहे पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पुणे किसन कुमार नजन पाटील यांचे सह पोलीस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहे.

गावात तणावपूर्ण शांतता पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले दोन्ही गटात वाद होतं हाणामारी झाली आहे गावात असून आतापर्यंत पोलिसांनी दहा ते बारा जणांना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यात आल्याची त्यांनी सांगितले . गावात शांतता कायम राखावी अफवांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांचे कडून करण्यात आले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे