आरोग्य व शिक्षणयावल

मुलाच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळेस संगणक भेट 

यावल (प्रतिनिधी)- तालुक्यातील विरावली येथील ॲड. देवकांत पाटील यांच्या मुलगा विराज याचे पहिल्या वाढदिवसानिमित्त विरावली येथील जि. प. मराठी मुलांच्या शाळेस संगणक संच म्हणून भेट देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनातील संगणक विषयी असलेले कुतूहल आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाठीची आवश्यकता ओळखत पाटील कुटूंबियांना दिलेल्या संगणक भेटीचे गावासह परीसरात ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

मुलाच्या पहिल्या वाढदिवसाचा आनंद म्हणून तालुक्यातील विरावली येथील एडवोकेट देवकांत पाटील यांनी वाढदिवसाला केक , जेवणवळीवर खर्च न करता गावातील, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संगणका विषयीची जिज्ञासा ओळखून पाटील कुटुंबीयांनी शाळेत संगणक संच भेट दिला कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते याप्रसंगी अजय पाटील यांनी ॲड.देवकांत पाटील हे नेहमी विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे सांगून त्यांनी शाळेला दिलेल्या भेटीचे कौतुक केले शाळेच्या उपशिक्षिका प्रियांका तायडे , पाटील कुटुंब , हेमराज पाटील, गोलू माळी ,विनोद पाटील विरवली वि. का. सोसायटीचे व्हा.चेअरमन नरेंद्र सोनवणे, प्रल्हाद पाटील ,संजय पाटील लीलाधर सोनवणे ,पवन पाटील गिरीश पाटील, आदींची याप्रसंगी उपस्थिती होती संगणक संच शाळेस भेट दिल्याबद्यल शाळेच्या वतीने शिक्षिका प्रियंका तायडे यांनी पाटील परिवाराचे आभार मानले .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे