यावलराजकीय

बोरावल खुर्द वि.का. सो.शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय..

विकास पॅनल चा धुवा

यावल :तालुक्यातील बोरावल खुर्द येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत शेतकरी पॅनलने संपूर्ण १३ जागा पटकावत दणदणीत विजय संपादन केला असुन परस्पर विरोधी विकास पॅनल एकही जागा जिंकू न शकल्याने विकास पॅनलचा धुव्वा उडाला आहे.

बोरावल विविध कार्यकारी सोसायटीचे कार्यक्षेत्रात बोरावल खुर्द, बोरावल बुद्रुक, टाकरखेडा, भालशिव, पिंप्री व टेंभी कुरन या पंचक्रोशीतील शेतकरी , सभासद म्हणून असल्याने तालुक्यातील मोठी विकासो संस्था मानल्या जाते या विकासोचे माजी चेअरमन सतीश पाटील व यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनलने हे यश संपादन केले आहे. विजयी झाल्याने शेतकरी पॅनल कडून गावात जल्लोष करण्यात आला.
शेतकरी पॅनलने प्रतिस्पर्धी दयाराम चौधरी यांच्या विकास पॅनल एकही जागा जिंकू शकले नाही.
शेतकरी पॅनलचे विजयी झालेल्या १३ उमेदवारांमध्ये यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी ( २६५), गुरूदास गंगाधर पाटील (२७०),संतोष आनंदा पाटील (२५४), कमलाकर लालचंद सपकाळे (२५१), समाधान रामदास पाटील (२४९ ), यशवंत बाबुराव चौधरी (२३९), भगवान भागवत कोळी (२३८),कुलदिप इश्वर पाटील (२३३), संजय नारायण महाजन ( २३१), अंजनाबाई अमृत पाटील (२४५),शशीकला समाधान चौधरी (२४४), रतन बन्सी कोळी ( २७८) व शरद सुदामदेव चौधरी (२६३) असे सर्व उमेदवार विजयी झाले आहे तर विजयानंतर शेतकरी पॅनलकडून जल्लोश करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. व्ही. महाजन यांनी काम काज पाहिलेपाहिले. निवडणूक शांततेत पार पडली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे