यावल

गुहाटी येथील वृद्ध दांपत्याला शहरातून मदत

यावल (प्रतिनिधी)उज्जैन येथील श्री महाकाल यांचे दर्शन घेवून यावल मार्गे शिर्डी येथे साईबाबांचे दर्शनासाठी जात असलेले गुवाहाटी( आसाम) येथील वृध्द दाम्पत्याचे  पैशांची पर्स एटीएम आणि मोबाईल चोरीला गेल्याने हताश वृध्द दाम्पत्य यावल उतरले आणि झालेली घटना कथन करत त्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली असता शहरातील दात्यांनी मदत करत गुवाहाटी कडे रवाना केले.

गुहाटी (आसाम ) येथील ६५ वर्षीय वृध्द व्यक्ती त्यांच्या पत्नी आणि मुलीसह तीर्थक्षेत्रासाठी निघाले होते ते उज्जैन महाकालचे दर्शन घेऊन त्यांना शिर्डीला साईबाबा चे दर्शन घेण्यासाठी जायचे होते बऱ्हाणपूर ते यावल दरम्यान बस मधे त्यांची पैशांची पर्स ,एटीएम, आणि मोबाईल चोरीला गेल्याने ते यावल येथे उतरले हताश झालेल्या कुटूंबियांना काय करावे ते कळत नव्हते . हे कुटुंब सुशिक्षित आणि उद्योजक होते त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे एटीएम , पैसे नसल्यामुळे कोणाला मदत मागायची ते विचारात पडले त्यांच्या हातात घड्याळ होते ते विकण्यासाठी गावात आले ते घड्याळ का विकत आहे असे मोहसीनखान यांनी विचारले आणि तिथल्या नागरिकांनी एस एच खान बँड या चौकात त्यांची विचारपूस केली त्यांना तिथे बसवले आणि सर्व हकीकत त्या शर्मा नावाची व्यक्ती यांनी घडलेली घटना सांगितली आणि तिथे आमचे मनसेचे कार्यकर्ते कुणालबारी यांनी चेतन आढळकर मनसे जिल्हाध्यक्ष यांना फोन लावला चेतन आढळकर हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांची सर्व सत्य परिस्थिती जाणून घेतली आणि स्वतः एक हजार रुपये मदत केली त्यांनी डॉ. कुंदन फेगडे ,राकेश कोलते ,सचिन मिस्त्री, प्रमोद बारी ,गणेश येवले, अजय तायडे ,शुभम वाणी ,यांना फोन वरुन घटना सांगितली असता त्यांनी तातडीने मदत पाठवली आणि त्या परिवाराला पाच हजार रुपये जमा करून चेतन आढळकर आणि त्यांचे मित्र परिवार यांनी त्यांना ती मदत दिली आणि स्वतः यावल येथून रिक्षा करून दिली व भुसावळ रेल्वे स्टेशन वर त्यांना त्यांच्या घरी जाण्याच्या प्रवासासाठी रवाना केले .दात्यांनी केलेल्या मदतीची व माणूसकीची शहरात प्रशंसा होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे