क्रिडा व मनोरंजनचाळीसगाव

कु.रेखा धनगरच्या हाँगकाँग भरारीला आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिले पंखांचे बळ…

ना.गिरीशभाऊ महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांनी स्विकारले वाघळी येथील बेसबॉल खेळाडू कु.रेखा धनगर हिचे पालकत्व...

हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सहभाग खर्चाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेणार – आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव (प्रतिनिधी)- हाँगकाँग येथे होणाऱ्या महिला बेसबॉल एशियन कप 2023 या स्पर्धेसाठी चाळीसगांवच्या रेखा धनगर हीची निवड करण्यात आली आहे. मात्र तिची घरची परिस्थिती अतिशय बेताची असू वडील ट्रॅक्टर वर चालक म्हणून काम करून उपजीविका चालवतात. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा खर्च त्यांना पेलणारा नव्हता. दि.१० एप्रिल रोजी तीला तिच्या १५ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी जालंधर पंजाब येथे झेलम एक्स्प्रेसने जायचे असल्याने त्यांना मदत म्हणून वाघळी गावातील अनेक तरुणांनी आपापल्या परीने निधी संकलन करण्याचा प्रयत्न केला मात्र अपेक्षित मदत निधी जमा होऊ शकला नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी अखेर चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची भेट घेतली त्यांना रेखाच्या आर्थिक अडचणीविषयी कल्पना दिली.

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी रेखाची परिस्थिती, तीने आजवर केलेला संघर्ष तसेच पुढील काळात देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी असलेला आत्मविश्वास पाहून तात्काळ तीला मदत करण्याच्या निर्णय घेतला. तसेच लवकरच राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांच्याशी संपर्क साधून दोघे मिळून कु.रेखा हिच्या स्पर्धेचा संपूर्ण खर्च उचलत पालकत्वाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर केले. अवघ्या एक दिवसांवर प्रशिक्षण आलेले असताना आर्थिक अडचणीमुळे कु.रेखाच्या स्पर्धेतील सहभागाविषयी अनिश्चितता निर्माण झाली होती, अखेर आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्यामुळे तीच्या हाँगकाँग भरारीला पंखांचे बळ मिळाले आहे.

कु.रेखाचा प्रवास प्रेरणादायी, तिचा आदर्श इतर मुलीनी घ्यावा – आमदार मंगेश चव्हाण

वाघळी सारख्या ग्रामीण भागातून व बेताच्या आर्थिक परिस्थितीतून आलेल्या रेखा धनगर सारख्या मुलीने स्वकर्तुत्वाने बेसबॉल सारख्या खेळात यश संपादन करत राज्यस्तरीय ५ पदक व राष्ट्रीय ४ पदक मिळविली आहेत. तिचा आदर्श इतर मुलीनी घ्यावा. कु. रेखा बेसबॉल खेळात देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत आहे हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. जळगाव जिल्ह्यातील ती एकमेव खेळाडू असून तीचा आत्मविश्वास हेवा वाटावा असा आहे. एक सामाजिक दायित्व म्हणून तिच्या हाँगकाँग येथे होणाऱ्या स्पर्धेचा संपूर्ण खर्च आम्ही उचलणार आहोत. ना.गिरीषभाऊ व मी आम्ही दोघे मिळून रेखाचे पालकत्व स्वीकारत आहोत. रेखाने या स्पर्धेत यश मिळवून चाळीसगावचे, जिल्ह्याचे व राज्याचे नाव मोठे करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो व तीला पुढल वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच तीला कुठलीही कमतरता भासू देणार नाही अशीही ग्वाही यानिमित्ताने देतो अशी प्रतिक्रिया चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली.कु.रेखा धनगर जालंधर (पंजाब) साठी रवाना…हाँगकाँग येथे होणाऱ्या महिला बेसबॉल एशियन कप २०२३ साठी भारतीय संघात २० महिला खेळाडूंचा समावेश झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील ७ मुली असून जळगाव जिल्ह्यातील कु.रेखा धनगर एकमेव आहे. सदर स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी पंजाब राज्यातील जालंधर येथे १५ दिवसांचे प्रशिक्षण होणार आहेत. त्यांनतर दिल्ली किंवा हरियाना येथे ५ मे ते २१ मे पुन्हा प्रशिक्षण शिबीर व २१ मे पासून ते २ जून पर्यंत हाँगकाँग येथे स्पर्धा होणार आहे. त्यासाठी जवळपास ८० ते ८५ हजार खर्च येणार होता, मात्र आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी थेट रेखाचे पालकत्व स्वीकारल्याने तिचा पुढील मार्ग सुकर झाला आहे. अखेर आज दि.१० एप्रिल रोजी चाळीसगाव येथून झेलम एक्स्प्रेसने जालंधर येथे रवाना झाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे