रावेर

श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न..

(रावेर प्रतिनिधी सानिया तडवी) – रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालय रावेर व द युनिक अकॅडमी पुणे, शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवशीय पदवी काळात MPSC /UPSC स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी? या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्र.प्राचार्य डॉ. ए. जी . पाटील तर प्रमुख व्यक्ते म्हणून विकास गिरासे हे होते . सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विध्यार्थी विकास अधिकारी प्रा. सत्यशिल धनले यांनी केले

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विकास गिरासे आणि नरेंद्र पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एमपीएससी,यूपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षा, इंटरव्यू याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी असणारी मानसिकता, वेळेचे नियोजन, संयम, सकारात्मक दृष्टिकोन विविध यशस्वी व्यक्तींचे अनुभव व संघर्ष विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. आपण ही जिद्दीने, मेहंतीने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतो असा आशावाद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. जी पाटील यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्र याचा परिपूर्ण उपयोग करून द्यावा, तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे करिअर म्हणून बघावे. असे आव्हान उपस्थित विद्यार्थ्यांना केले.सदर कार्यक्रमाचे आभार , प्रा. डॉ. एस.बी. गव्हाड यांनी केले. सदर कार्यशाळेस विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे