रावेर

आम्हाला खड्डयात गाडल्या वरच रावेर शहरातील खड्डे बुजणार का ?

रावेर प्रतिनिधी – हमीद तडवी

तालुक्यातील रावेर शहरात अनेक महिन्यांपासून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड यांचे साम्राज्य पसरले असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता दिसु लागली आहे. या खड्यांमुळे रहदारीला खुप अडथळा निर्माण होत आहे. कारण या रस्त्याने प्रवास करीत असताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या रावेर शहरातील रस्त्यांना खड्ड यांचे ग्रहण लागले आहे. हे बघुन संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा रस्त्यावर चे खड्डे न बुजण्याचे ग्रहण लागले की काय? असा प्रश्न तालुक्यातील वाहन धारक आणि जनतेने उपस्थित केला आहे. तरी संबंधित बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या खड्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन खड्यांमुळे होणारे वाहनधारक व जनतेचे हाल थांबवावे.आणि तात्काळ खड्डे बुजवावे. अशी रास्त स्वरुपाची मागणी वरिष्ठ अधिकारी यांचे कडे केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे