यावल

दहीगावात फलकाची विटंबना : गावात तणावपूर्ण शांतता

यावल (प्रतिनिधी)-तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमेची अज्ञात समाजकंटकाकडून विटंबना केल्याने रविवारी सकाळपासून गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. घटनेची खबर मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पो. नि. राकेश माणगावकर पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचत सरपंच अजय अडकमोल यांनी शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान गावातील वातावरण तणावपूर्ण शांत असून सर्व शेतीचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून उपअधीक्षक कुणाल सोनवणे ,पो.नि.राकेश माणगावकर पोलीस अधिकारी व ताफ्यासह तळ ठोकून आहेत

तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमेची शनिवारी रात्री दहा वाजेवाजेचे सुमारास अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. रविवारी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच, मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन दिले पोलीस उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले याप्रसंगी सरपंच अजय अडकमोल,कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांचे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर गंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी फौजदार अविनाश दहिफळे सुनील मोरे सुनिता कोळपकर यांचे सह पोलीस ताफा तैनात आहे. , दरम्यान पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉक्टर सोनवणे यांनी दिली. तणावपूर्ण वातावरण असल्याने यावल दहिगाव सावखेडा बस सेवा सकाळपासून बंद होती.

निळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर विष्णू पारधे, यांनी भेट देऊन शांततेचे आवाहन केले

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे