यावल

यावलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

यावल (प्रतिनिधी)-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरातील रस्त्यावर निळ्या पताकासह सह निळे ध्वज लावले असल्याने शहर निलमय झाले होते. महामानव्याच्या महामानवाच्या प्रतिमेचे पूजन आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.

काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे ,माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील ,माजी नगरसेवक गुलाम रसुल ,भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , अक्षय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे , प्रा. मुकेश येवले, तहसीलदार महेश पवार, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे ,कदीर खान ,अनिल जंजाळे, युवराज सोनवणे ,सागर गजरे , अशोक बोरकर, भिमराव वाघ , विक्की गजरे , नईम शेख कदीर खान   अनिल जंजाळे  प्रमोद पारधे,  हाजी गफ्फारशहा, नगरसेवक मनोहर सोनवणे, विकी गजरे, युवराज सोनवणे, प्रदिप गजरे , यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आकर्षक बग्गीवरून काढण्यात आलेल्या डॉ बाबा साहेबाच्या आंबेडकरांची प्रतिमा पुजन करत मिरवणुकीत सहभाग घेतला शहरातील बुरुज चौक , खिर्निपुरा नगिना मस्जिद, जुने भाजी बाजार बारी वाडा चौक , काजीपुरा मस्जीद , बोरावल गेट आंबेडकर नगर अशा मार्गाने मिरवणुक काढण्यात आलेल्या मिरवणुकीची सांगता पुनश्च पंचशील नगर सिद्धार्थनगर आठवडे बाजार परिसरात सांगता करण्यात आली. वाद्य वृंदाच्या गजरात अश्व रथावर महामानवाच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा काढत प्रतिमेचे जागोजागी पूजन करण्यात आले महिला वर्गांसह युवा वर्गात उत्साह संचारला होता  मिरवणुकीत सुमधुर भीम गीतांच्या तालावर तरूणाई बेधुंद होवुन नाचत होती .
यावेळी फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर , पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर , पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे , वरीष्ठ सहाय्यक फौजदार अजिज शेख , सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण , सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, सहाय्यक फौजदार असलम खान , सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान व त्यांच्या सर्व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी आपला बंदोबस्त चोख ठेवला .येथील खरेदी विक्री संघाच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स आवारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महामानवाच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष अतुल पाटील प्राध्यापक मुकेश येऊ दे यांची हस्ते करण्यात आले याप्रसंगी बोधडे नाना, डॉक्टर हेमंत येवले गणेश महाजन माजी उपनगराध्यक्ष राकेश कोलते यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे