यावल

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक यावल सह तालुक्यात तीन मतदान मतदान केंद्र

यावल(प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २८ एप्रिल रोजी होत असलेल्या निवडणुकीचे मतदानासाठी यावलसह साखळी व फैजपूर येथे मतदान केंद्र राहणार , असून झालेल्या मतदानाची मतमोजणी ३० एप्रिल रोजी पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखा परीक्षक पी.एफ.चव्हाण यांनी दिली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदान 28 एप्रिल रोजी सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत राहणार असून यावल शहरात शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय, तर तालुक्यातील साकळी येथे जि. प. प्राथमिक मुलींची शाळा, व फैजपूर येथे म्युनिसिपल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे मतदान केंद्र राहणार आहे. यावलसह साखळी व फैजपूर येथे सहकारी संस्था मतदार संघ व ग्रामपंचायत मतदार संघातील मतदार मतदान करतील तर व्यापारी व हमाल तोलारी मतदारसंघाचे मतदारांसाठी यावल येथेच मतदान करता येईल.

तालुक्यातील ४९ सेवा संस्था व ६७ ग्रामपंचायतचे मतदार संख्या मतदार संघ निहाय पुढील प्रमाणे विभागलेल्या आहेत. यावल- येथे सेवा सहकारी संस्था २१तर ३० ग्रा. पं, फैजपूर-येथे १३ सेवा सह. संस्था तर २० ग्रा. पं. साकळी-येथे १५सेवा सह. संस्था तर १७ग्रा.पं.अशा ४९ सेवा संस्था व ६७ ग्रामपंचायतीचे मतदार या मतदान , केंद्रावर मतदान करतील, मतदार संघ निहाय असलेले मतदार

सेवा सहकारी संस्था ६०४,ग्रामपंचायत मतदार संघ ६६७ , व्यापारी मतदारसंघ ३३३ ,हमाल तोलारी मतदारसंघासाठी१००८, असे मतदार आहेत ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी एफ चव्हाण यांनी दिली आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे