यावलराजकीय

यावल बाजार समिती निवडणूक :भाजप सेना प्रणित सहकार पॅनल चा १५ जागांवर दणदणीत विजय

महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनेलला केवळ तीन जागा

यावल (प्रतिनिधी)- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा- सेना- रिपाई (आठवले गट) प्रणित सहकार पॅनलने १५ जागा पटकावून दणदणीत विजय मिळविला आहे.तर महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे . भाजपा सेनेच्या शेतकरी विकास पॅनलने हा सलग चौथ्यांदा हा विजय मिळवला आहे. रविवारी येथील पंचायत समितीच्या नूतन सभागृहात मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी शांततेत पार पडली उमेदवार निवडीनंतर समर्थकांनी जयघोष करीत गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी केली.

विजयी झालेले उमेदवार:-सहकारी सेवा संस्था मतदार संघात ( सर्वसाधारण ) सहकार पॅनलचे हर्षल गोविंदा पाटील (३११) , दीपक नरोत्तम चौधरी (३१०) , उमेश प्रभाकर पाटील (३०८) , राकेश वसंत फेगडे (२९९) , सागर राजेंद्र महाजन (२९४) , पंकज दिनकर चौधरी (२८९) ,संजय चुडामन पाटील (२८२), इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये नारायण शशिकांत चौधरी (३९४) , महिला राखीव कांचन ताराचंद फलक (३५१) , राखी योगराज ब-हाटे (३३२) , भटक्या विमुक्त जाती जमाती व विमा प्रवर्ग उज्जैन सिंग भाऊलाल राजपूत (३२४) , ग्रामपंचायत मतदार संघ– सर्वसाधारण प्रवर्गविलास चंद्रभान पाटील (२९७) , सूर्यभान निंबा पाटील (२९६) ,  अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग – दगडू जनार्दन कोळी (३२५),आर्थिक दुर्बल घटक प्रवर्ग – यशवंत माधव तळेले (३२१) व्यापारी आडते मतदार संघ महाविकास आघाडीचे अशोक त्र्यंबक चौधरी(१८८) , सय्यद युनूस सय्यद युसुफ (१६७) हमाल मापाडी तोलारी मतदारसंघ — महाविकास आघाडीचे सुनील वासुदेव बारी(४६०) हे उमेदवार विजयी झाले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी पी.एफ . चव्हाण, तहसीलदार तथा निवडणूक निरीक्षक महेश पवार, सहाय्यक निवडणूक अधिकारी भारंबे यांचे नियंत्रणाखाली मतमोजणी शांततेत पार पडली

फेर मतमोजणी :- ग्रामपंचायत मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शेखर सोपान पाटील सहकार पॅनलचे सूर्यकांत निंबा पाटील यांचे मतामधे तीन मतांचा फरक असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार शेखर पाटील यांनी फेर मतमोजणीची मागणी केल्यावरून निवडणूक निर्णय अधिकारी चव्हाण यांनी दुसऱ्यांदा मतमोजणीचे आदेश दिले , फेर मतमोजणी केली असता त्यात कोणताही बदल झाला नाही.

दिग्गजांचा पराभव :- महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार तथा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर नारायण सोनवणे. जिल्हा बँक संचालक विनोद कुमार पंडितराव पाटील, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील , बाजार समितीचे माजी सभापती भानुदास चोपडे, केतन किरंगे , राष्ट्रवादी काँग्रेसचे चोपडा मतदार संघाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल दंगलराव पाटील यांना पराभवास जावे लागले.

उमेदवार निवडीनंतर जल्लोष :- भाजपा सेना सहकार पॅनलचे उमेदवार जस जसे निवडून येत होते तस तसा मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांनी गुलाल उधळत उमेदवारांचा जयघोष करत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली आहे.

पॅनलचे नेतृत्व :- महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व रावेर – यावल मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी यांनी केले तर भाजपा सेना – प्रणित सहकार पॅनलचे नेतृत्व बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी मसाका चेअरमन शरद महाजन, जिल्हा बँकेचे माजी संचालक गणेश नेहेते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील यांनी केले होते.

शिंदे गटांनी खाते उघडले :-भाजपा सेना प्रणित सहकार पॅनल मध्ये शिवसेनेचे , शिंदे गटाचे दगडू जनार्दन कोळी व सूर्यभान निंबा पाटील हे दोघे उमेदवार निवडून आल्याने बाजार समितीत शिंदे गटाने प्रथमच आपले खाते उघडले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे