ब्रेकिंगयावल

बस स्थानकावर प्रजापिता ब्रह्माकुमारी सेवा केंद्राने केले व्यसनमुक्ती पथनाटिकेतून प्रबोधन.

यावल:- येथील एस. टी. बस स्थानकाच्या आगार परिसरात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे वतीने रस्ता सुरक्षा अभिमान’ अंतर्गत बाल संस्कार केंद्राच्या मुलांनी व्यसनमुक्ती पर नाट्यकृती सादर करत एसटी कर्मचाऱ्यांसह उपस्थित प्रवाशांना व्यसनांच्या दुष्परिणामाविषयी प्रबोधन केले. आगार व्यवस्थापक दिलीप भास्कर महाजन , प्रजापिता ब्रह्माकुमारीज केंद्राच्या प्रमुख बी. के. राजश्री दिदी , बी.के.ज्योती दीदी प्रमुख म्हणून उपस्थित होत्या.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीज केंद्राच्या प्रमुख बी. के. राजश्री दिदी यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, ” मानव जन्म अनमोल असून व्यसनांमुळे मानवी जीवन वाया जाते. व्यसनांच्या आहारी गेल्याने आपले शारीरिक नुकसान तर होतेच पण कौटुंबिक, सामाजिक स्वास्थ्य ही खराब होते. शिवाय आपल्या मानसिक आरोग्याचा परिणाम प्रवाशांच्या जीवाशी येऊ शकतो. मनावर ताबा मिळवण्यासाठी आपल्याला राजयोग मेडिटेशन उपयुक्त ठरू शकते जे ब्रह्माकुमारीज केंद्रामध्ये निशुल्क शिकविले जाते”. आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत वारुळकर, दिव्या निळे, कांचन निळे, कु.जान्हवी, कु. हेमांगी, दीपक धनगर, मोहित पाटील,हेमंत पाटील तसेच यावल बस स्थानकाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे