रावेर शहरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ..
आठ बालकांसह ११ जणांना चावा, एक बालक गंभीर जखमी.
(रावेर – हमीद तडवी)
रावेर शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांने आठ बालक व तीन इसमांसह ११ जणांना चावा घेत त्यामुळे यात एक बालक गंभीर जखमी झाला . रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर सदर गंभीर बालकास पुढील उपचारांसाठी जळगावला पाठवण्यात आले आहे. दरम्यान नगर पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
रावेर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पंधरा ते वीस कुत्र्यांचे टोळके फिरत आहेत. आज सकाळी येथील सावदा रोड वरील यशवंत माळवे (वय २) यास तोंडावरील दोन्ही गाल व ओठावर पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्यास येथील ग्रामीण सग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ जळगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यानंतर या कुत्र्याने शहरातील अनेक भागात जाऊन शेख रशिद शेख आसिफ (वय १२), समर्थ करतार जाधव (वय १०), आस्मिन खान (वय ६), रेहान फारूक खाटीक (वय १६), शेख हसन शेख अजहर (वय ४.५), अथर्व पूर्ण नाव माहित नाही (वय ६), माहि दिलीप विंचूरकर (वय ४.५), हे आठ बालक तसेच नितिन हिराचंद महाजन (वय ३४), अलताफ शेख गफार (वय ३५), आनंद दत्तात्रय वाणी (वय ५०) आदि सर्व राहणार सौभाग्य नगर, जूना सावदा रोड, भराडी, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शाळा परिसर, रावेर या अकरा जणांना चावा घेऊन जखमी केले. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. डॉ. निकिता चौधरी, मोहिनी भारंबे, योगिता धिमळ, अन्नु चावरे, सतिष सुर्यवंशी यांनी उपचार केले.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा शहर व नविन वसाहत रावेर – सावदा रोड वरील मटन दुकानांच्या समोर मोकाट कुत्र्यांचा हौदोस सुरू असून पादचाऱ्यांना व वाहन धारकांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातून होत आहे .