५७ वर्षीय महिलेच्या डोक्यात वार करून निघृण खून..
भरवस्तीत हत्या, रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह..
जळगाव – शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये एका महिलेच्या डोक्यात वार करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. सुवर्णा राजेश नवाल वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी जळगाव असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये सुवर्णा नवल या महिला आपल्या पती राजेश नवाल यांच्यासह वास्तव्याला होत्या. त्यांचे पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. दरम्यान गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या पूर्वी सुवर्णा नवल ह्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केल्याचे कळते. दरम्यान रात्री ८.३० वाजता मयत सुवर्णा नवाल यांचे पती राजेश नवाल हे घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनांस्थळी धाव घेतली. भरवस्तीमध्ये एका महिलेचा खून झाल्याने आल्याने शहरामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात पती राजेंद्र नवाल, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.