चाळीसगाव

अतिदुर्गेम गुजरदरी गावाला मिळणार पक्का रस्ता…

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांनी केली रस्त्याची पाहणी...

चाळीसगाव – तालुक्यातील शेवटच्या टोकाला ५० किमी अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गेम भागातील गुजरदरी गावाच्या विकासाचा विषय नेहमीच चर्चेचा राहत आला आहे. चाळीसगाव हून गुजरदरी जाण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातुन जातेगाव मार्गे औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड व वैजापूर तालुक्याच्या सीमेवरून जवळजवळ ५५ किमी प्रवास करावा लागतो. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देखील साधा रस्ता व मुलभूत सुविधांची वानवा असणाऱ्या गुजरदरी गावाने आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी पाहिले, अनेक आश्वासने बघितली मात्र त्यांच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल असे एकही नेतृत्व या गावाला मिळाले नाही.

मात्र चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून गुजरदरी गावाला ७० लाख रुपयांचा केवळ निधी मंजूरच केला नाही तर त्यांच्या निविदाप्रक्रिया देखील झाल्या आहेत. यात गावाचा सर्वात महत्वाचा असणारा गुजरदरी हून लोढरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरण कामासाठी ५० लाख रुपये, गावांतर्गत रस्ता सुधारणा करण्यासाठी १० लाख रुपये, गावात सभामंडप उभारण्यासाठी १० लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत रस्त्याची भयानक दुरवस्था झाली असून पायी चालताही येणार नाही अशी परिस्थिती आहे, याबाबत सोशल मिडीयावर व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता, मात्र त्यापूर्वीच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या दूरदृष्टी व नियोजनातून गावासाठी रस्त्याची तरतूद करून ठेवली होती. पावसाळा सुरु असल्याने कामाला सुरुवात करता येत नव्हती मात्र आता गावाच्या मागणीनुसार त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व सबंधित ठेकेदार यांना तात्काळ रस्त्याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुपले व हेमंत चौधरी तसेच कंत्राटदार शिरसाठ यांनी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच नितीन पाटील व गावकऱ्यांसोबत रस्त्याची पाहणी केली. त्यामुळे लवकरात लवकर कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे अनेक दशकानंतर प्रथमच गुजरदरी गावाला जवळपास २ किमी हून अधिक रस्ता तयार करून मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे