जळगाव जिल्हा

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली, आयुष प्रसाद हे जळगावचे नवीन जिल्हाधिकारी

जळगाव – राज्य शासनाने अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यात जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा देखील समावेश आहे

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी 30 सप्टेंबर 2022 जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना एक वर्ष ही पूर्ण झालेले नसताना त्यांची बदली झाली आहे.

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या जागी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे आयुष प्रसाद पुणे जिल्हापरषदेचे सीईओ म्हणून कारभार सांभाळत होते. ते आता जळगाव जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांची यवतमाळ जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी अंकित पन्नू यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे