गुन्हेगारीब्रेकिंगयावल

पाच लाखाची लाच भोवली महालक्ष्मी पथसंस्थेवरील अवसायक ACB च्या जाळ्यात…

यावल (प्रतिनिधी)- गेल्या पंधरा वर्षापासून आर्थिक डबघाईस असलेल्या येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या, ताब्यात असलेल्या सावदा येथील नगरपालिकेच्या गाळ्या संदर्भात ५,००,०००/- रुपयाची लाच धुळे येथे स्वीकारत असताना पतसंस्थेच्या अवसायकास रात्री अटक केली आहे याबाबत येथील पोलीस ठाण्याला लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या बाबत येथील पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेवर प्रशासक म्हणून सखाराम कडू ठाकरे यांची नियुक्ती केलेली होती या पतसंस्थेच्या सावदा नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या व्यापारी संकुलातील गाळ्याच्या मालकाने कर्ज थकीत केल्याने हा गाळा पतसंस्थेने जप्त केला होता यानंतर गाळामालकाने कर्जफेडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही संबंधित गाळा आणि त्याची अनामत रक्कम ही त्याच्या नावावर करून देण्यासाठी सखाराम कडू ठाकरे यांनी गाळा मालकाकडे ५,००,०००/- रु लाचेची मागणी केली होती गाळामालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आवसायक सखाराम कडू ठाकरे वय 56 वर्ष राहणार ११ ,राधेय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पाचोरा जिल्हा जळगाव यांना धुळे येथे पंचा समक्ष लाच घेताना ताब्यात घेतले आहे याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमाण्वये त्याच्या विरूध्द धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत भेंडाळे , पो. नि.रूपाली खांडवी व सहकारी राजन कदम शरद काटके संतोष पावरा रामदास बारेला गायत्री पाटील प्रशांत बागुल मकरंद पाटील व वाहन चालक सुधीर मोरे यांचे पथकाने केली आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे