यावल

आगामी गणेशोत्सव ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत , साजरे करा -अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी

यावल (प्रतिनिधी)-आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे उत्सव शांततेत व उत्साहात साजरे पार पाडा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी येथील पोलीस ठाण्याची वतीने आयोजित शांतता समिती सदस्यांचे बैठकीत आवाहन केले. , बैठकीस पोलीस उपविभागीय उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर उपस्थित होते .

आगामी गणेशोत्सव ईद-ए-मिलाद नवरात्री उत्सव शांततेत पार पडावे यासाठी येथील पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील पोलीस पाटील उत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्यांची बैठक पार पडली. आपल्या देशात अनेक जाती- धर्माचे, लोक राहतात त्यामुळे विविध जाती धर्मानुसार सण उत्सव साजरे करत असतो आपण सर्व भारतीय समजून एकमेकाचे उत्सव शांततेत व उत्साहात पार पडतील व , कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार नाही याची आपण दक्षता प्रत्येकाने घ्यावी. आगामी उत्सव शांततेत पार पडतील असा आत्मविश्वास अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी व्यक्त केला. बैठकीत पोलीस उप अधीक्षक डॉ. कुनाल सोनवणे, हाजी शब्बीर खान मोहम्मद खान,,जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे, डॉ. निलेश गडे, पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, हबीब मंजर यांनी मनोगत व्यक्त केले. मंडळ पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विसर्जन मिरवणुकीतील शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना मांडल्या असता या सूचना संबंधित विभागाकडे पाठवून विसर्जन मिरवणुकी पूर्वी तक्रारी दूर करण्यात येतील असे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी मंडळांना अस्वस्थ केले. बैठकीस पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील तालुक्यातील पोलीस पाटील शांतता समिती सदस्य मंडळाचे पदाधिकारी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे