क्रिडा व मनोरंजनजळगाव

महापौर जयश्री महाजन यांना फुटबॉल संघटना व खेळाडू तर्फे निरोप

जळगाव (प्रतिनिधी) – महानगरीच्या प्रथम नागरिक श्रीमती जयश्री महाजन यांचा महापौर पदाचा कार्यकाळ आज संपत आल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जळगाव जिल्हा फुटबॉल संघटना तर्फे फुटबॉल खेळाडू च्या माध्यमाने व माजी जिल्हा सरकारी वकील तथा वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट केतन ढाके यांच्या अध्यक्षतेखाली निरोप देण्यात आला. संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी साने गुरुजी लिखित मराठी इस्लामी संस्कृतीचे पुस्तक व शाल देऊन त्यांचा गौरव केला.

महापौर चषक स्पर्धेची खंत

महापौर फुटबॉल चषक ही स्पर्धा घेण्याचे महापौर जयश्री महाजन यांनी अभिवचन दिले होते परंतु काही कारणांनी महापौर चषक घेता आले नाही अशी खंत फारुक शेख यांनी निरोप समारंभात व्यक्त केली. तसेच भविष्यात आपण जरी महापौर पदावर नसल्या तरी आपण क्रीडा क्षेत्रात ज्याप्रमाणे कामगिरी केली त्याप्रमाणे करून आम्हा क्रीडा संघटनाना सहकार्य करावे अशी आग्रहाची विनंती केली.

क्रीडा क्षेत्राला नेहमी सहकार्य राहणार – महापौर महाजन

महापौर जयश्री महाजन यांनी निरोप समारंभ घेताना फुटबॉल संघटनेचे सचिव शेख यांनी व्यक्त केलेल्या भावनांशी सहमत असून भविष्यात सुद्धा क्रीडा संघटनांना सहकार्य राहील तसेच महापौर चषक फुटबॉल स्पर्धा घेता आल्या नसल्या तरी त्या लवकरच कोणत्यातरी बॅनरखाली घेऊ असे सांगताच उपस्थित मुलं व मुलींनी त्यांच्या या घोषणेचे टाळ्या वाजवून स्वागत केले.एडवोकेट केतन ढाके यांनी जयश्री महाजन यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.निरोप समारंभाचे आभार फुटबॉल संघटनेचे सहसचिव अब्दुल मोहसीन यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे