यावलराजकीय

यावल तालुक्यात लोकनियुक्त सरपंच सह गिरडगाव ग्रामपंचायत व गाड्ऱ्याचे सर्व सदस्य बिनविरोध…

सरपंच च्या एकुण १० जागे करीता ३६ उमेदवार तर सदस्यांच्या एकुण ७७ जागे करीता १९४ उमेदवार रिंगणात

यावल :तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि नऊ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणूकित बुधवारी माघारीच्या अंतिम दिवशी गिरडगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सह संपूर्ण सदस्य हे बिनविरोध ठरले आहे तर गाड्ऱ्या ग्रामपंचायत चे सर्व नऊ सदस्य बिनविरोध झाले. माघारी नंतर तालुक्यातील लोकनियुक्त सरपंच सह एकुण २३ सदस्य बिनविरोध ठरले आहे तर आता लोकनियुक्त सरपंच च्या एकुण १० जागे करीता ३६ उमेदवार तर सदस्यांच्या एकुण ७७ जागे करीता १९४ उमेदवार रिंगणात आहे. माघारी नंतर चिन्ह वाटप झाले असुन ग्रामिण भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारी माघारी करिता तहसील कार्यालयामध्ये प्रचंड गर्दी झाली होती.

सदस्य पदा करीता ५६ तर सरपंच पदावरील १८ उमेदवारांनी माघार घेतली आहे.तालुक्यात १० ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रीक तर ९ ग्रामपंचायतीत पोटनिवडणुक होत आहे यात बुधवारी माघारीच्या दिवशी लोक नियुक्त सरपंच पदावरील १८ तर सदस्य पदाकरीता ५६ उमेदवारांनी माघार घेतली परिणामी गिरडगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सह संपुर्ण सदस्य तर गाड्ऱ्या ग्रामपंचायतीचे सर्व ९ सदस्य तसेच म्हैसवाडी, किनगाव खुर्द, सावखेडासिम, शिरागड या गावातुन एकुण २३ सदस्य बिनविरोध ठरले आहे तर आता एकुण १० लोकनियुक्त सरपंच पदा करीता ३६ उमेदवार रिंगणात असुन सदस्यांच्या एकुण ७७ जागे करीता १९४ उमेदवार रिंगणात आहे. बुधवारी माघारीच्या वेळे पर्यंत तहसिल कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती तर संपुर्ण प्रक्रीया तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी जी.टी. सोनवणे, सचिन जगताप, ए. वाय. बडगुजर, एम. पी. देवरे, एम.एच. तडवी, मीना तडवी, बबीता चौधरी, एस. एल. पाटील, एच. एन. तडवी, व्ही.डी. पाटील, एन.पी. वैराळकर, ए. एस. खैरनार, एस. आर. शेकोकार, के. पी. वायसे, सुयोग पाटील यांनी राबवली व माघारी नंतर निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले तर ग्रामिण भागात गुरूवार पासुन प्रचाराला सुरवात होत राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.

गिरडगावची बिनविरोध परंपरा कायम.

गेल्या दोन पंचवार्षीक पासुन गिरडगाव ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूकीचा पायंडा यंदा देखील कायम राहिला येथे लोकनियुक्त सरपंच म्हणुन आशा हुसेन तडवी तर सदस्य म्हणुन रेहाना तडवी, किशोर पाटील, आशाबाई पाटील,शकीला तडवी,मोहीनी पाटील व प्रभाकर पाटील बिनविरोध ठरले.

गाड्ऱ्या येथे केवळ लोकनियुक्त सरपंच करीता निवडणुक.

तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत अतिदुर्गम भागात वसलेल्या आदिवासी गाड्ऱ्या ग्रामपंचायतीचे काशिराम बारेला,शेवंती बारेला,सुलोचना बारेला,बिलवारसिंग बारेला,फुलसिंग बारेला,मीराबाई बारेला,शांताराम बारेला,लक्ष्मी बारेला,रमाबाई बारेला हे सदस्य बिनविरोध ठरले तर लोकसरपंच पदा करीता पाच उमेदवार रिंगणात आहे.

किनगाव खुर्द मध्ये तीरंगी लढत.

किनगाव खुर्द मध्ये बाजार समितीचे उपसभापती दगडू कोळी यांच्या पत्नी रूपाली दगडू कोळी सह हसिना गफुर तडवी व समीना शब्बीर तडवी यांच्या तीरंगी लढत रंगणार आहे

हे ठरले बिनविरोध.

म्हैसवाडी गावातुन काजल बाविस्कर,तुकाराम चौधरी, सपना चौधरी,मिना चौधरी हे चौघं तर किनगाव खुर्द स्वाती भुषण पाटील, सावखेडासिम मुस्तुफा तडवी, शिरागड रेखाबाई कोळी, बोराळे दिपाली चौधरी हे बिनविरोध ठरले आहे.–

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे