ब्रेकिंग

36 हजाराची लाच ; कामगार निरिक्षक एसीबी च्या जाळ्यात..

जळगाव – शहरातील सहकामगार आयुक्त कार्यालय येथे कामगार निरीक्षकाला 36 हजार रुपयाची लाच घेताना दि. ८ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

 मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पंडितराव पाटील (वय ५७, रा. वाघ नगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या कामगार निरीक्षकांचे नाव आहे. तक्रारदार हे माथाडी कामगार संघटनाचे उपाध्यक्ष व मुकादम असून तक्रारदार यांचे मित्र हे पण मुकदम होते. त्यांना मुकदम पदावरून स्थगिती देण्यात आली होती. त्याबाबत सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी चालू होती. या सुनावणीचा निकाल लावण्यासाठी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून निकाल लावून देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. ५ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी केली असता चंद्रकांत पाटील यांनी पंचासमक्ष तडजोड अंती ३६ हजार रुपये स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई हि  पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन. जाधव, पीएसआय दिनेश सिंग पाटील, पो.हे.कॉ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना. बाळू मराठे, पो.कॉ. प्रणेश ठाकूर, पोना. किशोर महाजन, पो.ना. सुनिल वानखेडे, पो.कॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. सचिन चाटे यांनी कारवाई केली.

ईतर महत्वाच्या बातम्या 

जळगाव जिल्ह्यात ९५००० क्विंटल ज्वारी खरीदीचे उदिष्ट वाढविले..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे