न्यू इरा एज्युकेशन सोसायटी संचलित रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूलचा “अमृत महोत्सवा निमित्त बक्षीस वितरण समारंभ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला..
जळगाव दि.16 -रोजी रोझलँड इंग्लिश मिडियम हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या अध्यक्षा माननीय रोजमीन खिमानी प्रधान मॅडम यांनी स्वीकारले तसेच .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव जिल्ह्याचे एसपी एम राजकुमार हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले . तसेच सनरोज फाउंडेशनचे संतोष प्रधान सर टीम यूएस चे आलिसा, लिली,शाद कार्यक्रमाला उपस्थित होते…
सदर समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय एस पी राजकुमार यांचा सत्कार शाळेच्या अध्यक्षा माननीय रोजमीन मॅडम यांनी केला.शाळेचा अमृत महोत्सवा निमित्त विविध स्पर्धां चित्रकला , हस्ताक्षर , भुलाबाई,तसेच ,विभागीय स्तरावरील खेळ,शालेय स्तरावरील खेळ इंटरस्कूल स्पेलिंग बी,आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, ना .धो.महानोर यांच्या स्मरणार्थ रान कविता महोत्सवात इंग्रजी,हिंदी व मराठी कविता वाचन ,स्पर्धा बॉक्सिंग राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण माननीय राजकुमार एस.पी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच संस्थेत दहा वर्षापेक्षा जास्त सेवा देणा-या शिक्षकांचा सत्कार माननीय एस पी यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच शाळेच्या लता मंगेशकर सभागृहाचे उद्घाटन माननीय एस .पी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमात माननीय एस पी यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.प्रश्नोत्तर कार्यक्रम झाला.पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गोड कौतुक केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.प्रियंका कोळी मॅडम व निकी वेद मॅडम यांनी केले.बक्षीस वितरण समारंभासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.सदर कार्यक्रमासाठी रोझलँड इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका रोझलँड प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.समारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला.