MIDC पोलीसांची कारवाई परजिल्हयातील आरोपीकडून चोरीच्या ५ मोटारसायकल हस्तगत..
जळगांव – दि.२२ रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपणीय माहिती मिळाली होती की, अजिंठा चौकात एक ईसम हा चोरीच्या मोटार सायकली विक्रिसाठी येणार आहे अशा गोपणीय माहितीवरुन गुन्हे शोध पथकास माहीती काढने बाबत सांगीतले असता सदर पथकातील कर्मचाऱ्यांनी, अजिंठा चौफुली येथे साध्या वेषात थांबुन दिपक प्रेमसिंग सोळंके, रा वरठाण,ता सोयगांव जिल्हा छत्रपती संभाजी नगर यास ताब्यात घेतले व त्याचेजवळ मिळुन आलेली एच एफ डीलक्स कंपनीची मोसा बाबत माहीती काढली असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने सदर मोटार सायकल बाबत अधिक माहीती घेतली असता जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहीती मिळुन आली. त्यावरुन दिपक सोळंके यास विचारपुस केली असता त्याने अजुन जळगाव शहरातुन ३, छत्रपती संभाजीनगर येथुन १, आणी अडावद येथुन १ अशा एकुण ५ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. सदर मोटर सायकल हया त्याच्याकडुन हस्तगत करण्यात आल्या.
सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, पोना योगेश बारी, पोका राहुल रगडे, विशाल कोळी, फिरोज तडवी यांनी केलेली आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
अखिलस्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र संघटना, रावेर तालुका कार्यकारणीची बैठक संपन्न..
४ हजारांची लाच : महावितरणच्या महिला सहाय्यक अभियंत्यासह, लाईनमन व तंत्रज्ञ ACB च्या जाळ्यात..