आडगाव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजन : १७० उपकरणांचा सहभाग..
कासोदा – पंचायत समिती शिक्षण विभाग व धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय यांचे संयूक्त विद्यमाने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन अत्यंत जोरात सपंन्न झाले . विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन तालुक्याचे आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
विज्ञान प्रदर्शनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष शालीग्राम श्रीपत पाटील होते . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एरंडोल तालुका गटविकास अधिकारी दादाजी जाधव , गट शिक्षणाधिकारी आर डी महाजन , तालुका पोषण आहार अधिक्षक जे डी पाटील , संस्थेचे संचालक जयराम चौधरी , रमेश पाटील , ग्रा प सदस्य प्रल्हाद पाटील , यू टी महाजन , रूषीकेश पाटील , जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे खजिनदार भगतसिंग पाटील , आर टी पाटील , अजिज बारी , एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलाणेकर , ग्रा प सदस्य धिरज पाटील , दत्तू पाटील केंद्र प्रमुख जयेश अहिरराव , मनिषा सोनवणे , अल्लाउदीन शेख , राजेंद्र मोरे , विस्तार अधिकार गुरगुडे , बाळू मोरे , सुनिल महाजन , मधुकर देवरे , समिता पाटील तालुका विज्ञान समन्वय प्रमुख अमोल वाणी सह शिक्षण विभागाचे बी आर सी चे कर्मचारी उपस्थित होते .
यावेळी उद्घाटक आमदार अमोल पाटील पाटील यांनी सांगितले की , विज्ञानाशिवाय तरणोपय नाही ज्ञान असणे काळाची गरज आहे ज्ञान असेल तरच मनुष्य आपले कार्य सिध्द करू शकतो . प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करतांना गट शिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन यांनी सांगितले की , जगात विज्ञानाने खूप मोठी मजल मारली असून विज्ञानामुळे जगात फार मोठा बदल झाला म्हणून विविध शोध विज्ञानामुळे यशस्वी होत आहे . तालुक्यातून जि प शाळा माध्यमिक शाळा यांनी सहभाग नोंदविला आहे . दुसऱ्या सत्रात बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष एरंडोल नगर पालिकेचे मुख्यधिकारी अमोल बागुल यांनी आपल्या मनोगतात प्रखर मत मांडले विज्ञानाला जवळ करा अंधश्रध्देपासून दूर राहण्याचे मत त्यांनी मांडले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे पर्यवेक्षक एस एस पाटील व किरण पाटील यांनी केले . विज्ञान प्रदर्शनात एकूण ५ गट होते . त्यात प्राथमिक व उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक चैताली पाटील व डिंम्पल पाटील डि के पाटील माध्यमिक विद्यालय आडगाव द्वित्तीय क्रमांक नंदिनी गोसावी के डी पाटील इंग्लीश स्कूल एरंडोल , तृतीय क्रमांक आसमा शेख अँग्लो उर्दु हायस्कूल एरंडोल उत्तेजनार्थ हर्षिता पाटील होली इग्लीश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक आदित्य पाटील रा ति काबरे एरंडोल , द्वितीय मोहम्मद खान शहजायई स्कूल कासोदा , तृतीय क्रमांक प्रवण पाटील संत हर हर विद्यालय निपाणे , उत्तेजनार्थ नयन पाटील सिध्देश्वर हायस्कूल पिंपळकोठा , प्राथमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक मनोहर पाटील जि प उत्राण द्वितीय निलिमा मराठे बालशिवाजी मंदीर एरंडोल माध्यमिक गटात प्रथम समिता पाटील जिजामाता माध्यमिक एरंडोल प्रयोग शाळा परिचय गटात प्रथम रविंद्र अहिरे सरस्वती माध्यमिक विखरण या गटातील स्पर्धकांनी नैसर्गिक व विज्ञानावर आधारित सुरेख उपकरणे सादर केली होती .दिव्यांग गटात वेदिका मोरे साधना माध्यमिक शाळा कासोदा शेवटी आभार शाळेचे मुख्याध्यापक तथा एरंडोल तालुक्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी आभार मानले सर्व तालुक्यातील मान्यवर व विद्यार्थांना शाळेने स्नेहभोजनाचे आयोजन केल्याने सर्वत्र कौतूक होत आहे .