जळगाव सायबर सेलची मोठी कामगीरी..
ऑनलाईन फसवणूकीच्या अनेक प्रकरणातील १ कोटी ११ लाखाची रक्कम परत मिळवून देण्यात यश..

जळगाव – जिल्ह्यातील काही नागरिकांना सायबर ठगांनी करोडो रुपयात लुबडल्याच्या अनेक तक्रारी जळगाव सायबर सेलचकडे आल्या होत्या.जळगाव सायबर सेलच्या पथकाने तीन महिन्यात दोन गुन्ह्यात ७० लाख तर इतर गुन्हे मिळून ४०लाख असा ऐकून १ कोटी ११ लाख ४२ हजार ९३२ रुपयांची रोकड परत मिळवून देण्यात यश आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
शेअर मार्केटच्या नावे १ कोटीचा लावला होता चुना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतकुमार कृपाराम उईके यांना दिनांक १८ जुलै ते दि. २६ सप्टेंबर २०२४ पावेतो अंकित अग्रवाल, मिरा यांनी संपर्क करुन शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतवणुक करिता वेगवेगळया व्हॉटॲप ग्रुपमध्ये अॅड करुन केले. अलांकित नावाचे अॅप्लीकेशन त्यांना डाऊनलोड करण्यास सांगुन फिर्यादीकडुन शेअर मार्केटींगमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास सांगितले. सुरवातीला फिर्यादी यांना भरलेल्या रक्कमेवर ३५०० रुपये नफा झाल्याचे सांगून त्यांच्याकडुन एकूण १ कोटी ६ लाख ६ हजार ९८५ रुपये ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे घेवुन त्यांना कोणताही परतावा न देता त्यांची फसवणुक केली होती.
संतकुमार कृपाराम उईके यांनी घटनेबाबत दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायबर पो.स्टे येथे तक्रार दिली होती त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पथकाने फिर्यादी यांनी ज्या वेगवेळ्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते त्यापैकी, युको बँक गुजरात व आंध्रप्रदेश येथील बँक खाते तात्काळ गोठवण्यात आले. त्यामधील एकूण ५२ लाख ४७ हजार रुपये हे पैसे न्यायालयामार्फत आदेशीत करुन फिर्यादीच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येवुन फिर्यादीस परत मिळवुन दिली आहे.
तसेच अजून एका व्यक्तीस डिजीटल अरेस्ट करून १८ लाख लुबाडले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गुलाबराव गरुड यांना दिनांक १९ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राहुल गुप्ता व त्याचा असिस्टंट संदीपराव यांनी संपर्क करुन फिर्यादी यांना मनी लॉडरिंगमध्ये तुमचे सिमकार्ड, पॅनकार्ड व आधाकार्ड चा वापर झाल्याने तुमच्या विरुध्द मुंबई क्राईम ब्रांन्च येथे गुन्हा नोंद झालेबाबत भासवले. राजेंद्र गुलाबराव गरुड यांना डिजीटल अरेस्ट करुन वारंवार धमकी देवुन खोटी कोर्टाची ऑर्डर व ईतर खोटे कागदपत्रे त्यांच्या व्हाटसअप क्रमांकावर पाठविले.त्यांच्याकडुन १८ लाख रुपये रक्कम स्वीकारुन त्यांची आर्थिक फसवणुक करण्यात आली होती.
घटनेबाबत दिनांक ७ डिसेंबर रोजी सायबर पो. स्टे येथे माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम 66 (डी) प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पथकाने फिर्यादी यांनी इंडसइंड बँक खात्यामध्ये पैसे भरले होते त्या बँक खात्याची माहीती काढुन बँक खाते जालंदर पंजाब येथील असल्याची माहीती प्राप्त झाल्याने खात्यात असलेली १७ लाखांची रक्कम तात्काळ गोठवली होती. संपूर्ण रक्कम न्यायालयाच्या मार्फत फिर्यादीस परत करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश अहीरे, हेमंत महाडीक, सचिन सोनवणे अशांनी केली आहे.