महाराष्ट्र

मैत्रेय प्रकरण निकाली लावण्यासाठी मुंबई येथे सक्षम अधिकाऱ्यांसोबत (MPID)बैठक संपन्न..

बलवाड़ी प्रतिनिधी आशीष चौधरी

मैत्रेय प्रकरणातील परताव्यासाठी व मैत्रेय प्रकरणला योग्य प्रकारे दिशा मिळवून ठेवीदारांना त्यांचा हक्काचा पैसा लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी मुंबई येथे अधिकाऱ्यांसमोर महत्वपूर्ण बैठक व काही पत्र व्यवहार करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना व त्यांच्या विभागात निवेदन देण्यात आले. उपमुख्यमंत्री गृह विभाग च्या अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले .अप्पर पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनाही निवेदन देण्यात आले. मुंबई शहराचे उपजिल्हा अधिकारी MPID तथा सक्षम अधिकारी यांना निवेदन देऊन मैत्रेय प्रकरण जलदगतीने चालवून पीडित ठेवीदारांचा परतावा लवकरात लवकर मिळेल यावर सखोल चर्चा शासन नियुक्त उपजिल्हाधिकारी मा. प्रीती पाटील मॅडम यांच्याशी मैत्रेय असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या प्रकरणावर मी पूर्णपणे सहकार्य करेल असे आश्वासन सक्षम अधिकारी यांनी दिले. कोर्टातील कामकाज संपल्या नंतर असोसिएशने या प्रकरणातील तपास संबंधित अधिकाऱ्यांशी गाठीभेटी घेऊन मैत्रेय प्रकरणावर सकारात्मक सखोल चर्चा करून मैत्रेय प्रकरण लवकर मार्गी लावण्याचे अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले .मैत्रेय प्रकरणातील तपास अधिकारी पोलीस निरीक्षक परब मॅडम (मुंबई) यांच्याशीही कोर्टात सखोल चर्चा करण्यात आली व मैत्रेय प्रकरणात येणारे अडथळे दुर करून प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन तपास अधिकारी परब मॅडम यांनी दिले . मैत्रेय असोसिएशनच्या प्रयत्नामुळे मैत्रेय पीडित ठेवीदारांचा परतावा मिळवण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत .ह्या प्रकरणात असोसिएशनचे नानासाहेब पाटील पिंटू दर्डा भैय्यासाहेब माळी, राजेंद्र देवरे , यासीन सय्यद, डी.यू.पाटील ,सुरेश सपकाळे, सुरेश खैरनार, राजेंद्र पवार, पंकज खैरनार ,पांडुरंग बनगर,उदय संखे,डाॅ.हरपनहळ्ळी. असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे