गुन्हेगारीजळगाव

Exclusive : जळगावात मक्तेदाराच्या घरावर टोळक्याचा तलवार घेऊन हल्ला, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

जळगाव प्रतिनिधी | जळगावातील एका ठेकेदाराच्या घरावर अज्ञात १५-१६ हल्लेखोरांनी तलवारी यासह इतर हत्यारे घेत हल्ला केला आहे. या प्रकारामुळे जळगावात खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे.

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर यातील धनाजी काळे नगरात राहणारे मक्तेदार विशाल वाघ यांच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात १५-१६ हल्लेखोरांनी हल्ला केला. दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत दोन तलवारी आणि दगडांच्या साहाय्याने त्यांच्या घराचा बाहेरील दारावर हल्ला केला. दरम्यान, विशाल वाघ व त्याचा भाऊ घरी नसल्याने कुटुंबीयांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले होते. कुटुंबातील सदस्यांनी हिंमत करत शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली असून याबाबत पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

हल्लेखोरांनी शहरात आणखी दोन तरुणांच्या घरावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. संपूर्ण थरारक प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. जळगाव शहरात टोळक्यांची गुंडगिरी वाढताना दिसत आहे. अनेक महिन्यापासून जिल्ह्यासह शहरात प्रकार वाढत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे