चोपडा रोडवरील वढोदा गावाजवळ असलेल्या बेहेडे ऍग्रो टेक दुकानात चोरी,अज्ञात चोरट्यांनी ४७ हजाराचा मुद्देमाल लांबवला
यावल : तालुक्यातील वढोदा येथे गावालगतच बेहडे ॲग्रोटेक दुकान आहे व बाजूला गोडाऊन आहे येथे मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी शटर व दरवाज्याचे कुलूप तोडून चोरी केली आहे. येथून चार क्विंटल कापूस, स्प्रे पंप व इतर साहित्य असा एकूण ४७ हजाराचा मुद्देमाल लांबवला आहे.ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असुन याप्रकरणी अज्ञात चोरटयांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वढोदा ता. यावल या गावाजवळ दीपक बेहडे रा.यावल यांचे बेहडे ॲग्रोटेक दुकान आहे आणि जवळच शेतात गोडाऊन आहे या ठिकाणी सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोडाऊनचे शटर चे कुलूप तोडले तसेच दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणी २४ हजार रुपये किमतीचे चार क्विंटल कापूस, २० हजार रूपये किमतीचे होंडा कंपनीचे शेत पिकास खत देणारे एक पंप आणि ३ हजार रूपये किंमतीचे एक फवारणी पंप असा एकूण ४७ हजाराचा मुद्देमाल चोरी झाला आहे. हा प्रकार सकाळी निदर्शनात आला व चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात देखील कैद झाली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दीपक बेहेडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.