बलवाडी येथील निखिल पाटील राज्य कला प्रदर्शनात विद्यार्थी विभागातून महाराष्ट्र राज्यातुन पहिला
बलवाड़ी प्रतिनिधी आशीष चौधरी
बलवाड़ी ता. रावेर येथील रहीवाशी निखिल संजय पाटील याने गृहसजावट विभागात ( इंटिरिअर डिझाईनर) कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तर्फे आयोजीत राज्य कला प्रदर्शनात विद्यार्थी विभागातून महाराष्ट्र राज्यातुन प्रथम क्रमांक मिळवला. बुधवार दि. २४ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, ठाणे येथे कार्यक्रम घेण्यात आला. या वेळेस महेश आडबल आणि प्रसिद्ध चित्रकार व सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथील सेवानिवृत्त प्राध्यापक आणि सत्कारमूर्ती श्रीकांत जाधव यांच्या शुभहस्ते निखिल संजय पाटील याला महाराष्ट्र राज्यातुन प्रथम क्रमांक मिळवला म्हणुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळेस सन्माननीय अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत पाटील,
सन्माननीय अतिथी मा. पालकमंत्री, जि.ठाणे शंभूराजे देसाई, ,लोकसभा सदस्य राजन विचारे, विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक,संजय केळकर,उपमुख्यमंत्री अजित पवार,महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहूणे,माजी महापौर ठाणे महानगरपालिका नरेश म्हस्के,भा.प्र.से.चे अभिजीत बांगर,प्रमुख उपस्थिती, भा.प्र.से चे जिल्हाधिकारी, ठाणे.
आयुक्त, ठाणे महानगरपालिका अशोक सिंगारे,विकास चंद्र रस्तोगी (भा.प्र.से.) प्रधान सचिव, राजीव मिश्रा,उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, कला संचालक, कला संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या उपस्थितित कार्यक्रम पार पडला. निखिल संजय पाटील ललित कला महाविद्यालय, नाशिक येथील गृहसजावट विभागाचा विद्यार्थी असून याचे बलवाडी परिसरातुन सर्वत्र कौतुक होत आहे.