10 हजाराची लाच : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह खाजगी पंटर ACB च्या जाळ्यात..

रावेर – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक यांच्यावर 10 हजार लाच प्रकरणी जळगाव एसीबीने करवाई केली असून . विजय भास्कर पाटील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खानापुर (राज्य उत्पादन शुल्क वर्ग-३), व भारकर रमेश चंदनकर खानापुर, (खाजगी इसम) असे त्यांचे नावे आहेत.

यातील तक्रारदार यांचे वडिल यांचेवर दारूबंदी कायदयान्वये यापुर्वी कारवाई झालेली आहे. त्यानंतर दारूबंदी कायदयान्वये कलम ९३ प्रमाणे कारवाई न करण्याकरीता विजय पाटील हे तक्रारदार यांच्याकडे १२,०००/- रूपये लाचेची मागणी करीत असले बाबतची ला. प्र. वि. जळगाव येथे दिनांक 17 रोजी लेखी तक्रार दिली होती,
त्याप्रमाणे दिनांक १७ रोजी पडताळणी केली असता लोकसेवक विजय भास्कर पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व चालक भास्कर रमेश चंदनकर (खाजगी इसम) यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे वडिल यांवेवर दारूबंदी कायदयाचे कलम ९३ प्रमाणे कारवाई न करण्याचे मोबदल्यात तसेच दारूचा धंदा यापुढेही चालु ठेवायचा असल्यास १,५००/- रूपये प्रति महिन्याप्रमाणे १२ महिन्यांचे एकुण १८,०००/- रूपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणुन १०,०००/- रूपये लाचेची मागणी केली व सदरची लाच रक्कम चालक भारकर रमेश चंदनकर (खाजगी इसम) यांनी पंचा समक्ष स्वीकारली म्हणुन भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७ व ७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर करवाई
एसीबी चे पोलीस उप अधिक्षक, योगेश ठाकुर, हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, पो.ना/बाळु मराठे, पो.अं/भुषण पाटील, यांनी केली.