मुक्ताईनगर

माहेरच्या बांगड्यांच्या रुपाने मिळाली रोहिणी खडसेंना मायेची अनुभूती

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण व सेवाकारण यांच्या समन्वयातून साधले जाते ते राजकारण हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या खडसे परिवारातील राष्ट्रवादीच्या काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांना कुऱ्हा येथे मतदारसंघातील नागरिकांच्या मनात वसलेले खडसे परिवाराविषयी आस्था, प्रेम यांची अनुभूती मिळाली.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काही मोजकेच नेते आहेत, ज्यांनी आपली सुरुवात शून्यातून केली. मात्र जिद्द, चिकाटी, अभ्यासपूर्ण वत्कृत्व यासोबतच आपल्या संपूर्ण मतदारसंघालाच कुटुंब मानून केलेला लोकसंग्रह. राजकारण तर बरेच जण करतात पण राजकारण हा समाजकारणाचा उत्तम मार्ग आहे आपल्या वृत्तीतूनच नव्हे तर कृतीतून दाखविणाऱ्या एकनाथराव खडसे यांनी गेले तीस वर्ष मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. या तीस वर्षात त्यांनी सर्व जातीधर्माला सोबत घेऊन राजकारण, समाजकारण केले कोणी त्यांच्याकडे काही काम घेऊन आल्यास कोणताही पक्षीय किंवा इतर भेदभाव न करता प्रत्येकाचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. काम करत असताना सर्व मतदारसंघाला आपला परिवार मानुन कार्य केले प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जाण्याचा प्रयत्न केला संकटात गरिब श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्येकाची मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पक्ष विस्तारासाठी शहर खेड्यापासून अगदी आदिवासी पाड्यापर्यंत गेले. झोपडीत बसून मिळेल ती चटणी भाकरी खाऊन राजकारण, समाजकारण केले म्हणूनच त्यांना लोकनेते म्हटले जाते.

आ. एकनाथराव खडसे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा राजकीय सामाजिक वारसा पुढे नेण्याचे काम राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे करताना दिसुन येत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अल्प मतांनी पराभव झाला तरी पराभवाने खचुन न जाता त्यांनी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून मतदारसंघात समाजकार्य सुरू केले.

मतदारसंघातील आनंदाचा प्रसंग असो वा दुःखाचा त्या प्रत्येक ठिकाणी आवर्जून हजर असतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणी काही अडचणी, समस्या घेऊन आल्यास त्या सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. मतदारसंघात मोठ्या नेत्यांपासून अगदी वाड्या वस्तीवरच्या कार्यकर्त्यांसोबत आणि नागरिकांसोबत त्या सतत संपर्कात राहून त्यांची अडीअडचणी समस्या जाणून घेत असतात. त्यांच्यासोबत संवाद साधत असतात.

संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघाला आपले कुटुंब मानून कार्य करत असल्याने, मतदारसंघातसुद्धा प्रत्येक कुटुंबात त्यांना मुलीप्रमाणे प्रेम मिळते. याचा प्रत्यय काल (दि.१२) कुऱ्हा येथे आला. एका भूमीपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त रोहिणी खडसे या कुऱ्हा भागात असताना, बांगडी विक्रीचा व्यवसाय करणारे राजूभाऊ सातपुते यांनी रोहिणी खडसे यांना हाक मारून आपल्या दुकानावर बोलवले. रोहिणी खडसे यांनी त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत तात्काळ आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून राजू सातपुते यांच्या दुकानाला भेट दिली.

यावेळी राजूभाऊ सातपुते यांनी रोहिणी खडसे यांना त्यांच्या दुकानातील बांगड्या भरण्याचा आग्रह केला. रोहिणी खडसे यांनी त्यांच्या विनंतीचा मान ठेऊन सातपुते यांच्याकडून आपल्या हातात बांगड्या भरून घेतल्या. राजूभाऊ सातपुते यांनी आपल्या मुलीप्रमाणे रोहिणी खडसे यांच्या हातात बांगड्या भरल्या. याक्षणी राजूभाऊंच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून उपस्थितांना जणू एक बापच आपल्या मुलीला बांगड्यांचा आहेर देत असल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. हा क्षण तेथे उपस्थित अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये छायाबद्ध केला.

रोहिणी खडसे यांनीसुद्धा आपल्या फेसबुक व इतर सोशल मिडिया माध्यमावर या प्रसंगाची पोस्ट केली असून त्यासुद्धा या प्रसंगातून गहिवरून आल्याचे दिसून येते. आपल्या पोस्ट मध्ये त्या म्हणतात, भारतीय संस्कृती मध्ये कंगण म्हणजेच बांगडीला सौभाग्याचे भुषण मानले जाते. माहेरी आलेल्या मुलीला बांगड्या भरण्याची आपली प्राचीन प्रथा आहे. तस मुक्ताईनगर हे माझे माहेर आणि सासर सुद्धा.. गेले चाळीस वर्षात आ. एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघाला आपले कुटुंब मानूनच कार्य केले म्हणून मला तालुक्यात कुठेही गेले तरी आपल्या घरातील एक मुलगी म्हणूनच मान मिळतो. आज कार्यक्रमानिमित्त कुऱ्हा येथे गेली असताना तेथील बांगड्यांचे व्यावसायिक राजूभाऊ सातपुते यांनी आग्रहपूर्वक दुकानावर बोलावून माझ्या हातात बांगड्या भरल्या त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या स्वतः च्याच मुलीच्या हातात बांगड्या भरत असल्याचे समाधान होते. खरच हा एक सुखद अनुभव होता.

मतदारसंघात फिरत असताना अशा लहान मोठ्या कृतीतून गेली चाळीस वर्षात एकनाथराव खडसे यांनी माणसांचा जो गोतावळा जमा केला त्याचा पाऊलोपाऊली अनुभव येतो. यावरून रोहिणी खडसे यांचा आपल्या मतदारसंघात तळागाळातील लोकांपर्यंत असलेला जनसंपर्क आणि आस्था दिसून येते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे