मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत LCB ची कारवाई : 341 किलो गांजा जप्त..

मुक्ताईनगर – दि.१९ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना गोपनिय माहिती मिळाली की मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मानेगांव येथे एकाने आपल्या शेतात मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केलेली आहे.

त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे मुक्ताईनगर पो.स्टे. हद्दीतील मानेगाव येथे शेतात छापा टाकला. असता मनोज नामदेव घटे वय ४० वर्ष रा. मानेगाव ता. मुक्ताईनगर जि. जळगांव यास ताब्यात घेवुन त्याचे शेतातून ५१ गांजाची झाडे वजन ३४१ किलो ५०० ग्रॅम (३ क्विटल ४१ किलो ५०० ग्रॅम किं. अं. २३,२२,२००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपी मनोज नामदेव घटे मानेगाव ता. मुक्ताईनगर जि. जळगांव याचे विरुध्द मुक्ताईनगर पोलीस स्टेशन एन.डी.पी.एस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर कारवाई
पोलीस अधीक्षक, जळगांव, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, राहुल गायकवाड, व मुक्ताईनगर नगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केली