महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन २०२४ ची विद्यापीठ कार्यकारणी जाहीर

जळगाव – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ही विद्यार्थी न्याय हक्कासाठी कार्य करणारी एक अराजकीय विद्यार्थी संघटना असून संविधानिक पद्धतीने विद्यार्थ्यांचा लढा हा बुलंद करणारी विद्यार्थी संघटना आहे.
या शैक्षणिक वर्षात देखील कबचौ उमवी विद्यापीठामध्ये महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ने विद्यार्थी ने हक्कासाठी कार्य करणारे अशा विद्यार्थी शिलेदारांना जबाबदारी देऊन त्यांच्यातले नेतृत्व विकास करण्याची संधी मासु संघटना दरवर्षी देत असते त्याचप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांना नेतृत्व विकासाची संधी व विद्यार्थ्यांना न्याय हक्कासाठी कार्य करण्याचे व्यासपीठ हे दिलेले आहे याप्रसंगी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे राज्य उपाध्यक्ष ॲड. दिपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, महानगर अध्यक्ष प्रथमेश मराठे, यांच्या उपस्थितीत विद्यापीठात नवीन कार्यकारिणीच्या सहकाऱ्यांना पदग्रहण देऊन संघटनेचे उद्देश व कार्य याबाबत राज्य उपाध्यक्ष ॲड दिपक सपकाळे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यापीठ कार्यकारणी पुढीलप्रमाणे – विद्यापीठ अध्यक्षपदी पृथ्वीराज पाटील यांना संधी देण्यात आली तर उपाध्यक्षपदी रितेश शिंदे संघटक पदी मोहित सोनवणे तसेच युवती वस्तीगृह प्रमुख अस्मिता पोद्दार,वैष्णवी शेळके, प्रिया पाटील, श्रद्धा अहिराव यांना जबाबदारी देण्यात आली सोबतच कॉम्प्युटर सायन्स प्रयोग शाळेमधील विद्यार्थ्यांना सुद्धा संधी देण्यात आली प्रशाळा अध्यक्ष मयूर बंडे, उपाध्यक्ष प्रमोद सोनी,सदस्य भावेश नाले, संघटक वेदांत पवार
यांना संधी देण्यात आली पुढील वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कार्य हे विद्यापीठात करण्यात येईल व अजून मोठ्या प्रमाणावर जे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी कार्य करू इच्छिता अशा विद्यार्थ्यांनी मासूच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे सुद्धा आव्हान करण्यात आले आहे.