जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ९ जुन रविवार रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी हा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यात खान्देशातून रावेर लोकसभा मतदार संघातून हॅटट्रिक करणाऱ्या रक्षा खडसे ह्या देखील मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
राजधानी नवी दिल्लीत आज राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा शपथविधी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीए सरकारचे पंतप्रधान म्हणून आज दिल्लीमध्ये शपथ घेत आहेत.महाराष्ट्रामधून पाच जणांना मंत्रिपद जवळपास निश्चित झालं आहे. ज्या खासदारांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात येणार आहे, त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन केले गेले आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल आणि उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी संधी देण्यात येणार असल्याचे खात्री लायक वृत्त आहे.
जळगाव जिल्ह्यातून हॅट्ट्रिक करीत निवडून गेलेल्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्री पदी निवड झाल्याचा निरोप येताच त्यांनी आनंद व्यक्त करत याचे सारे श्रेय तिसऱ्यांदा निवडून दिल्या बद्दल जनतेला आणि विश्वास व्यक्त केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचा नेत्यांना दिले आहे.
शपथविधी सोहळ्यास एकनाथ खडसेंची उपस्थिती..
दरम्यान माजी मंत्री आणि रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथराव खडसे यांना प्रतिक्रिया देताना आपल्या परिवारातील सदस्य केंद्रीय मंत्री होत असल्याबद्दल आपला आनंद गगनात मावत नसून आपण शपथविधीला हजर राहणार असल्याचे सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या..
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय, या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस…
बालरंगभूमी परिषद तर्फे सर्व कला व लोककलांच्या महास्पर्धा घेण्याचे नियोजन..