वादळी वारा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मंजुर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तहसीलदार यांच्याकडे मागणी..
बोदवड (प्रतिनिधी) : तालुक्यात २०२१ ते २०२३ दरम्यान अनेकवेळा झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे व वादळवाऱ्यामुळे शेत शिवारातील खरिप व रब्बी हंगामातील पिकांचे व घरांचे गोठयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या नुकसानीची पाहणी करून महसुल व कृषी यंत्रणेकडे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आणि नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा मार्फत शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याने विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी सुद्धा डिसेंबर २०२३ मध्ये हिवाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्याला मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी उत्तर देताना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती परंतु त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि तालुका अध्यक्ष आबा पाटिल यांनी तात्काळ नुकसान भरपाई मिळण्या बाबत दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
त्यावर शासनाने नुकसानग्रस्ताना नुकसान भरपाई मंजुर केलेली होती परंतु मिळणारी अनुदानाची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग न करण्यात आल्यामुळे अनुदानाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आबा पाटिल यांनी परत एकदा जळगाव जिल्हाधिकारी यांना दि.५ मार्च २०२४ रोजी निवेदनाद्वारे केली होती अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यावर जळगाव जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकी नंतर तात्काळ डी बि टी प्रणाली द्वारे नुकसानीची प्रलंबित रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल तरी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारु नये असे तालुका अध्यक्ष आबा पाटिल यांना दि. १५ मार्च २०२४ रोजी लेखी पत्रा द्वारे कळविले होते.
आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे कळविल्या नुसार अद्यापही पात्र नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यात नुकसान भरपाईच्या अनुदानाची मंजुर रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही. खरिप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकरी बांधवांची बियाणे खरेदीची लगबग आहे तरी लवकरात लवकर मंजुर नुकसान भरपाईच्या अनुदानाची रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे,तालुका अध्यक्ष आबा पाटिल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बोदवड तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फ़े शेतकरी बांधवां समवेत बोदवड तहसिल कार्यालय येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फ़े तहसीलदार यांना देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष आबा पाटिल, यु डी पाटिल सर, रामदास पाटिल,सतिष पाटिल,अजय पाटिल, नईम बागवान,फिला राजपूत,प्रमोद भाऊ फरफट, प्रकाश पाटिल,किरण कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या
मंत्री रक्षा खडसेनां मिळाली क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी..
महाराष्ट्र योगशिक्षक संघाची भुसावळ तालुका कार्यकारिणी जाहीर..