नाशिक

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात 93.48 टक्के मतदान..

नाशिक(प्रतिनिधी)- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे मतदान प्रक्रिया विभागात शांततेत सुरळीतपणे पार पडली.नाशिक विभागात एकूण 90 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील 69 हजार 368 मतदानापैकी 64 हजार 846 इतके मतदान झाले असून 93.48 टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा व अपर आयुक्त निलेश सागर यांनी दिली.

विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 25 हजार 302 मतदारापैंकी हजार 23 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 91.63 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 17 हजार 392 मतदारापैंकी 16 हजार 327 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 93.88 टक्के मतदान झाले आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 8 हजार 159 मतदारापैंकी 7 हजार 651 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 93.77 टक्के मतदान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण 13 हजार 122 मतदारापैंकी 12 हजार 500 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून जिल्ह्यात 95.26 टक्के मतदान झाले आहे. नंदूरबार जिल्ह्यात एकूण 5 हजार 393 मतदारापैंकी 5 हजार 184 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 96.12 टक्के इतके मतदान नंदूरबार जिल्ह्यात झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे